पोलिसांच्या ढिसाळपणामुळे संतप्त जमावाचा दोन तास रास्ता रोको
शहादा- प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावरील केदारेश्वर मंदिराच्या वळणावर भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत प्रितेश राजेंद्र पाटील (27, कवळीथ, ता.शहादा) हा युवक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली़ अपघातानंतर पोलिसांनी केलेल्या ढिसाळपणाच्या व कंटेनर चालकाला पकडण्यात हलगर्जीपणा केल्याने नागरीकांनी तब्बल तापी पुलावर दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.
सुजलॉनचा कर्मचारी अपघातात ठार
कवळीथ येथील प्रितेश राजेंद्र पाटील हा युवक नंदुरबार येथील सुजलॉन येथे अभियंता म्हणून नोकरीस होता़ सकाळची शिफ्ट असल्याने तो आपल्या दुचाकीने (एम.एच.39 टी. 8350) प्रकाशा येथून नंदुरबारच्या दिशेने येत असताना कंटेनरला वळण घेता न आल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटून त्याने थेट दुचाकीला धडक दिली तर युवक साधारणत 20 फुटापर्यंत कंटेनरच्या चाकात अडकून फरफटत गेला़ गंभीर घटना घडल्यानंतरसुध्दा पोलीस कर्मचार्यांनी कंटेनर चालकाला पकडण्यात ढिसाळपणा दाखविल्यामुळे जमावाकडून प्रकाशा-तापी पुलावर सुमारे दोन तास रास्ता रोको करण्यात आला.