शहादा । नगकपालीकेची निवडणूक सहा महिन्यापूर्वी पार पडली. निवडणुकीत सत्तापरीवरीवर्तन होऊन लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मोतीलाल पाटील हे निवडूण आले. पदभार स्विकारल्या नंतर त्यांनी स्वच्छ शहर, सुंदर शहर ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवली. त्यादृष्टीने वाटचाल करीत त्यांनी स्वच्छ शहर करण्यासाठी पाटचार्या मधील घान साफ करण्यांवर जोर दिल्या आहे. त्याबद्दल शहरात चांगल्या प्रतिक्रीया उमटत आहेत. मात्र शहरातील अनेक समस्या आजही ‘जैसे थे’ च आहे. शहादा शहरातुन ग्रामीण भागात जाणारा खेतीया रस्ता हा खुपच त्रासदायक ठरतो आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे व खेतीया रस्त्यावर बनविण्यात आलेल्या दुभाजकामुळे हा रस्ता अरुंद झालेला आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण झाली आहे.
अस्वच्छता पसरल्याने आरोग्य धोक्यात
उत्तर व पश्चीमेकडील गावांसाठी हा एकमेव जवळचा मार्ग असल्याने एस.टी. महामंडळाच्या बसेसला ह्या रस्त्यावरुन मार्ग काढणे कठीण झाल्यामुळे महामंडळाच्या गाड्यांना मार्गावर बंदी घालण्यात आलेली आहे. याचा फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसतो आहे. तब्बल 6 किलोमीटरचा फेरा मारुन प्रवास सुरु आहेत. वाढीव फेर्यामुळे प्रवाशांना 7 रुपये अतिरिक्त द्यावे लागत असल्याने अधिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. दुभाजकामुळे हा रस्ता अरुंद झालेला आहे. तसेच या रस्त्याच्या आजुबाजुला ट्रका, खाद्य विक्रीच्या हातगाड्या उभ्या असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. दुभाजकांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पडून असल्याने अस्वच्छा पसरली आहे. पोलीस प्रशासन आणि नगर पालीकेने समन्वयाने यातून मार्ग काढावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दुभाजकांमध्ये वृक्ष तसेच सुशोभिकरणाची केल्यास रस्ता सुंदर दिसेल व पर्यावरणाचे संतुलन देखील राखले जाईल त्यादृष्टीने नगरपालिकेने प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.