शहाद्यात कठुआ घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा

0

शहादा:- जम्मू काश्मिरातील कठुआमध्ये आठ वर्षीय बालिकेवर नराधमांनी अत्याचार करून तिचा खून केल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाईसह या प्रकाराची निष्पन्न चौकशी करण्याच्या मागणीसाठी शहरातील विविध मुस्लिम संघटनानी घटनेच्या निषेधार्थ सोमवारी मूक मोर्चा काढला. तहसीलदार मनोज खैरणार व पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांना निवेदन देण्यात आले. मूक मोर्चात पाच हजारांहून अधिक मुस्लीम समाजबांधवांचा सहभाग होता.