शहाद्यात देशव्यापी संपाला पाठिंबा ; रास्ता रोकोने वाहतूक ठप्प

0

शहादा- महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा, जाती अंत संघर्ष समिती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देशव्यापी सार्वत्रिक संपाला पाठिबा देऊन मंगळवारी दुपारी 12 वाजता स्वस्तिक पेट्रोल पंपाने जवळ रास्ता रोको आंदोलन कॉ. सुनिलभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

या मागण्यांसाठी रास्ता रोको
सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण व जीवनावश्यक वस्तूचे सट्टा बाजारावर बंदी या सारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून महागाई नियंत्रण आणणारी प्रभावी पावले उचलणे, रोजगार निर्मिती साठी ठोस उपाययोजना करून बेरोजगारीवर नियंत्रण आणावे, ग्रामीण व शहरी भागात मागेल त्याला किमान वेतन मिळविण्याची हमी द्या व त्याची अंमलबजावणी करा या सह अन्य मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.

यांचा रास्ता रोकोत सहभाग
महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष कॉ.सुनिल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शहादा येथे स्वस्तिक पेट्रोल पंप जवळ रास्ता रोको करण्यात आला. कॉ.सुनील गायकवाड यांनी मोदी सरकार वर हल्ला बोल केला. मोदी सरकारने गेल्या चार वर्षात शेतकरी, शेतमजूरांची दिशाभूल करून विदेश वरीतच लक्ष केंद्रित करून शेतकर्‍यांवर अन्याय केला असून निव्वळ खोटी आश्वासने देऊन सामान्य मानसाची फसवणूक केली असल्याचे ते म्हणाले. कॉ.कैलास महिरे यांनी वाढत्या महागाई विरोधात आपले मत मांडले. यावेळी कॉ.उत्तम पवार, कॉ.खंडू सामुद्रे, कॉ.संतोष गायकवाड, कॉ.राजाराम ठाकरे, कॉ.धनराज बागले, कॉ.बनू माळी, कॉ.नइम सैय्यद, कॉ.रमाकांत बच्छाव, कॉ.प्रताप ठाकरे, सतीलाल महिरे,गणेश पेंढारकर,अर्जुन पान पाटील, विशाल महिदे,श्रीराम महिरे, राहुल मोहीदेकर,दिनेश गुलाले, दिनेश बागले, दीपक मोहीते,राजेंद्र बिरारे,बानुबाई बिरारी,सुशिलाबाई शीरसाठ,शंकूतला निकम,मायबाई शिसाठ ,कार्यकते मोठया प्रमाणावर उपस्थित होते. रास्ता रोकोचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका केली.