शहादा : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. नंदुरबार जिल्ह्यातही कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान शहादा शहरात ४५ वर्षीय महिला आणि ३१ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच अक्कलकुवा येथेही एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या 7वर पोहोचली आहे. दोघांना नंदुबार येथे शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील १४ जणांना क्वाँरोनटाईन करण्यात आले आहे.
शहरात कोविडचे रूग्ण आढळून आल्याने महसूल विभाग ,नगरपालिका व पोलिस प्रशासन आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने बागवान गल्ली सील केली आहे.