प्राध्यापकाच्या बंद घराला चोरट्यांनी केले टार्गेट : परीसरात घबराट
शहादा- शहरातील संभाजी नगरातील प्रा.देविदास निकुंभे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी भल्या पहाटेस दरवाजाचे कुलुप तोडुन रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे साडे पाच लाख रुपयांच्या ऐवज लंपास केला. प्रा.देविदास निकुंभे हे लोणखेडा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवेत आहेत . गेल्या चार दिवसापूर्वी त्यांच्या मुलीचा विवाह मोठ्या धामधुमीत झाला. 23 जुलैै रोजी प्रा. निकुंभे आपल्या परीवारासह मुलीच्या सासरी वरणगाव येथे कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपून मंगळवारी पहाटे पाच वाजता शहादा येथे घरी आल्यानंतर त्यांचा घरफोडी झाल्याचे लक्षात आले.
कुटुंब घरी पोहोचताच चोरट्यांनी काढला पळ
प्रा.निकुंभे व कुटुंबातील सदस्य पहाटे घरी पोहोचले असता त्यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले तर दरवाजा उघडताच चोरटे घरातून पळाले. तीन चोरटे असल्याचे सांगण्यात आले. प्रा.निकुंभे यांच्या मुलाने पाठलाग केला पण चोरटे पळुन जाण्यात यशस्वी झाले. चोरट्यांनी लाकडाच्या फर्निचरमध्ये बनवलेले कपाट उघडून त्यातुन अडीच लाख रुपये रोख व 10 तोळे सोन्यासह साडे पाच लाख रुपयाचा ऐवज लंपास केला. शहादा पोलीसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला व पोलीसात घरफोडीचा गुन्हा दाखल केला. ठसे तज्ञांनी ठश्यांचे नमुने घेतले आहे. पोलिस निरीक्षक संजय शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बडगुजर व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला.