शहाद्यात ना.आठवले 11 जुलैला येणार

0

शहादा। रिपाइचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा हस्ते येत्या 11 जुलैला शहादा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रिपाइ कार्यकर्त्यानी व सामाजीक कार्यकर्यानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर यानी केले आहे.

यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक शहादा विश्रामगृहावर घेण्यात आली. याबैठकीचा अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर हे होते. तर प्रमुख उपस्थितीत भिमराव अहिरे, सुभाष पानपाटील, शशिकांत कुवर, अनिल कुवर, प्रविण बिरारे, भिकुलाल ढोडरे, धनराज निकुंभे, साहेबराव इशी,अनिल आगळे, योगेश आगळे ,हितेंद्र आगळे ,दशरथ घोडराज ,रतिलाल इशी, श्रीपय ढोडरे आदीसह जिल्हयातील कार्यकर्ते उपस्थित होते.