शहाद्यात ना.महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध

0

शहादा। दारु विकली जात नाही, राज्यात 5-6 मद्यावर ब्रँड आहेत, दारूचा खप वाढविण्यासाठी दारुच्या ब्रँडना महिलांची नांवे द्या, या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात शहादा तहसिल कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे यांच्या नेतृत्वाखाली ‘जोडे मारो’ आंदोलन करुन मंत्री गिरीश महाजन यांचा निषेध करण्यात आला. महाजन यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेस जोडे मारुन तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आले. शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या शुभारंभप्रसंगी महाजन यांनी हे वक्तव्य केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात विविध ठिकाणी महाजन यांच्या प्रतिमेला ’जोडे मारो’ आंदोलन केले होते. याचाच एक भाग म्हणून शहाद्यात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी रेखाबाई बोरसे, रमणबाई सोनवणे, नायकाबाई भील, गंगाबाई ठाकरे, रंभाबाई भील, व्दारकाबाई भील, लक्ष्मा भील, मुलकन भील, प्रमिला भील, निर्मला भील आदी सहभागी होत्या. ना.गिरिष महाजन हे भाजपाचे जबाबदार मंत्री असुन त्यांनी समस्त महिलांचा अवमान केला आहे. महिलाचा अपमान करणे भाजपाची संस्कृती असल्याची भावना आंदोलन कर्त्या महिलांनी व्यक्त केली. ना.महाजन यांचा पक्षाने राजीनामा घ्यावा अशी आमची मागणीही यावेळी करण्यात आली.