शहाद्यात पोलीसाचे घर चोरट्यांनी फोडले

0

कुटूंबीय बाहेरगावी गेल्याने साधली संधी

शहादा । शहरात बोहरी कॉलनी जवळील शहादा पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पो. हे. का चंद्रकांत कुलकर्णी यांचे घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन पोलीसांचाच घरी डल्ला मारल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. पोहेका चंद्रकांत कुलकर्णी हे आपल्या परिवारासह मुंबईला आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेले आहेत. बंद असलेले घर बघता चोरट्यांनी त्याचा फायदा घेतला. पुढचा दरवाज्याचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. घरातील दोन्ही गोदरेज कपाटाचे दरवाज्याचे कुलुप तोडुन सर्व साहित्य बाहेर फेकलेले होते. मागचा दरवाजा उघडुन चोरटे पळाल्याचे प्रथम दर्शनी लक्षात आले. घराचे दोन्ही दरवाजे उघडे होते तर गेटला् मात्र कुलुप लावलेले होते. घटनास्थळी दोन चपलांचेजोड, तोडलेले कुलुप आढळुन आले.

शनिवार मध्यरात्रीची घटना
चंद्रकांत कुलकर्णी मुंबईला असल्याने नेमका किती ऐवज चोरीला गेला हे ते आल्यावरच समजु शकेल. उशीरापर्यंत त्यांची माहिती मिळालेली नव्हती. शेजारील डॉ. पाटील यांच्रा सरक्षण भिंतीचे बांधकाम सुरु आहे. त्यांना कुलकर्णी यांचा घराचे दार उघडे दिसल्याने त्यांनी पोलीसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक बडगुजर यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी भेट देवुन पहाणी केली. पोलीसांनी चंद्रकांत कुलकर्णी यांचाशी संपर्क साधला. पोलीसात प्राथमिक स्वरूपात घरफोडीची नोंद करण्यात आली आहे. सदरची घटना ९ सप्टेंबरचा मध्यरात्री झाली असल्याच संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.