शहाद्यात भिलीस्थान टायगर सेनेतर्फे उद्या बिर्‍हाड आंदोलन

0

शहादा । भिलीस्थान टायगर सेनेतर्फे विविध मागण्यांसाठी शहादा तहसील कार्यालयावर 24 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बेमुदत बिर्‍हाड आंदोलन करण्यात येणार असून याबाबत नायब तहसीलदार वाय डी पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील आदिवासी तरूणांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन या सेनेचे अध्यक्ष रवि ठाकरे यांनी केले आहे. या आंदोलनाची सुरूवात मार्केट यार्ड येथून होणार असुन ढोल, पावरी, कलापथक नृत्यासह बिर्‍हाड आंदोलन होणार आहे.

शिक्षकांवर दबाव
जिल्हा परिषद मराठी शाळेत व प्रथम प्रायमरी इंग्लिश शाळेतील मुख्याध्यापक , शिक्षक यांच्यावर दबाव आणून बोगस आदिवासी मुलांना शाळेत नाव दाखल करतांना हिंदू कोळी असतांना देखील टिकते कोळी म्हणून दाखल करण्यात आले आहे अशयांची नोंद चौकशी करून टोकरे कोळी शाळेच्या नोंदी रद्द करण्यात याव्यात, आदिवासीत घुसखोरी व अतिक्रमण करणार्‍या बोगस आदिवासींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सकाळी अकरापासून सुरूवात
या मागण्यासाठी 24 जानेवारी रोजी 11 वा तहसीलदार कार्यालयावर होणार्‍या बिर्‍हाड आंदोलनात आदिवासीबांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष रवि ठाकरे, उपाध्यक्ष सामेवार्‍या ठाकरे, सचिव न्हानू ठाकरे वेडु भील आदींनी केले आहे.

या आहेत प्रमुख मागण्या
नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी क्षेत्राबाहेरील गांवाना अनुसूचीत क्षेत्रात समाविष्ट करून कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, शहादा तालुक्यातील पंतप्रधान आवास योजना प्रतीक्षा यादीची चकशी होऊन बोगस आदिवासींना आदिवासी कोट्यातून हटविण्यात यावे, आदिवासीत बोगस आदिवासींची घुसखोरी थांबविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर 9 सदस्यांची कमिठी गठीत करण्यात यावी, तालुक्यातील सर्व समाजातील दुर्बल घटकातील वंचीत लोकांना अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात यावे यासह विविध मागण्या आहेत.