शहादा । येथील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभाराने शहादेकर नागरीकांमध्ये नाराजीचा सूर दिसुन येत आहे. अगोदरच विज पुरवठा पाहिजे त्या पुरेशा दाबात मिळत नाही. त्यामुळे विद्युत उर्जेवर चालणारी उपकरणे कमी अधिक प्रमाणात चालतात. दरम्यान, मुस्लिम बांधवांच्या पवित्र महिना रमजान सुरु झाल्यांपासून सकाळची 6 ते 8 अशी दोन तासाची लोड शेडींग बंद करण्यात आली आहे. भर उन्हाळ्यात विद्युत पुरवठा पाहिजे त्या अत्यावश्यक दाबात होत नाही. कमी व्होल्टेजमुळे नागरीक त्रस्त असतांना आता तर गेल्या चार पाच दिवसापासून तर विद्युत पुरवठा केव्हा खंडीत होतो व केव्हा सुरळीत सुरु होतो तेच कळत नसल्याची नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
विद्युत पुरवठा सुरळीत करण्यावर भर
महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी शहादा येथे संपर्क साधला असता अभियंता धिरज यादव यांनी सांगितले की, विकास फिटरवर जास्त प्रमाणात भार येत असल्याने पुन्हा पुन्हा विद्युत पुरवठा खंडीत होतो. शिवाय हवेचा जोर जास्त असल्यांने तार हलुन विद्युत पुरवठा खंडीत होतो. आता वेगवेगळ्या धर्माचे सण सुरु असल्याने विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार नाही. पण रविवारी विद्युत पुरवठा बंद करुन मलोणी शिवार व शहादा शहर असे दोन वेगवेगळे भाग करुन विद्युत पुरवठा विभागण्यात येईल त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
आर्थिक झळ
खंडीत झालेला विज पुरवठा पुन्हा सुरु झाला की विद्युत दाबाचे प्रमाण कमी असते त्यामुळे बर्याच नागरीकांचे टी. व्ही., पंखे नादुरुस्त झालेत नागरीकांना त्याची आर्थिक झळ बसल्याचे बोलले जात आहे. एकीकडे शासन लोड शेडींग मुक्त महाराष्ट्र बनविण्याचे आश्वासन देते तर दुसरीकडे शहरात असा प्रकार झाल्याने संतप्त प्रतिक्रिया आहेत.
लोंबळकरणार्या तारा धोकादायक
मागील आठवड्यात मृगनक्षत्राची चाहुल लागली पाऊस साधारण तीन तास पडला. त्याअगोदर आलेल्या वादळाने बर्याच वेळ विद्युत पुरवठा खंडीत होता. शहरात लोंबकळणार्या तारा ह्याला कारणीभुत आहे. पावसाळ्या सुरु होण्यापुर्वी पोल सरळ करुन लोंबकळनार्या तारा सरळ करणे अपेक्षीत होते. पण तसे झाले
नाही.