शहादा । शहादा येथे राजकीय वादातून एमआयएमचे गटनेते सद्दाम तेली यांचा खून झाल्याने दोन गटात तुफान दंगल उसळली. दगडफेक, दुकानाची तोडफोड असे प्रकार घडल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. पोलीसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या घटनेचे पडसाद शहरात उमटले आहेत. संतप्त जमावाने एक पोलीस व्हॅनसह अन्य दोन गाड्यांवर दगडफेक करून गाड्यांचे नुकसान केले आहे. तर माजी उपनगराध्यक्ष मुक्तार शेख याच्या अल्युमिनीयम सेक्शनचा दुकानाची तोडफोड संतप्त जमावाने केली असुन पोलीसांचा बंदोबस्त आहे.
राजकीय मतभेदातून हाणामारी
यापुढेही एम.आय.एम.चे चार नगरसेवक व त्यांचे समर्थकांध्ये महेमुद उर्फ मुन्ना शें यांच्यात राजकीय मतभेदामुळे हाणामारी झाली होती. पोलीसांनी वेळीच बंदोबस्त केला असता तर ही दगडफेक व जाळपोळीच्या तसेच तलवार व गुप्तीने हाणामारीची घटना घडली नसती. या घटनेतही काही भागांमध्ये पोलीसांची भुमिका बघ्याची राहिली आहे असे नागरीकांमध्ये चर्चा आहे. शहरात रात्री उशीरापर्यंत तणाव सदृश्य परिस्थीती होती. बांधकाम सभापती सद्दामतेली दगावल्याने तणाव वाढला आहे.
जमावाद्वारे वाहनांची तोडफोड
सैय्यद मुजफर अली, सै.लियाकत अली यास एम.आय.एमचे गट नेता तथा न.पा.चा बांधकाम सभापती सद्दाम तेली हा डॉ.बी.डी.पाटील यांच्या रूग्णायात पहाण्यासाठी गेले होते. यावेळी टिपु मुक्तार शेख याने सद्दाम तेली याचा पाठीमागे गुप्ती खुपसुन त्यांना गंभीर जखमी केले. सद्दाम तेलीवर धुळे येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. संतप्त जमावाने व त्याचा समर्थक जमावाने गरीब नवाज कॉलनी परीसरात दगड फेक, व गाड्यांची तोडफोड केली. या तोडफोडी दरम्यान पोलीस वाहनांवर दगड फेक करून मोठे नुकसान करण्यात आले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास माजी उपनगराध्यक्श मुक्तार शे.अहमद यांच्या दुकानाची तोडफोड करून दुकानाला आग लाऊन जाळपोळ केल्याची घटना घडली. दुपरी दिड वाजेपासुन गरीब नवाज कॉलनी परीसरात दंगल सदृष्य वातावरण असल्याने पोलीस बद्दोबस्तासाठी नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, म्हसावद, सारंगखेडा आदी भागातून पोलीस कुमक मागवण्यात आली आहे. तसेच राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या मागविण्यात आले असल्याचे समजते.
जखमींना एक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. त्यावेळी बांधकाम सभापती सद्दाम तेली हे त्यांना पहण्यास जात असता त्यांना सार्वजनिक ठिकाणी गाठून त्यांच्या पाठीमागून येवून काही युवकांनी त्याच्यांवर धारधार तलवारीने हल्ला केला.
12 जणांना अटक
दरम्यान पोलिसांनी संध्याकाळी 12 जणांना अटक केली आहे. यात माजी नगराध्यक्ष शेख मुखतार शेख अहमद यांच्यासह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान जमावाने गरीब नवाज कॉलनीत दुकानांवर व पोलिस गाडीवर दगडफेक केली आहे. या दगडफेकीमध्ये पोलिस गाडीचे नुकसान झाले आहे. जमावाचे उग्र रूप बघता कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी परिसरातील पेट्रोल पंप बंद करण्यात आला होता. यामध्ये पोलिस बंदोबस्तामध्ये कमी पडत असल्याचे दिसत होते. जमावाच्या दगडफेकीत एक पोलिस निरीक्षक जखमी झाले आहेत.
सुडबुद्धीने वाढविला वाद
बुधवार 14 जुन रोजी दुपारी एक वाजता गरीब नवाज कॉलनी शहादा येथे कालु मिस्तरीच्या घराजवळ पिण्याचा पिण्याचा टँकरने पाणी वाटपाचे काम मुजु पहेलवान करत होता. माजी नगरसेवक महमुद उर्फ मुन्ना याने टँकर माझा अंगणात लावण्यास सांगुन नंतर तुमच्या अंगणात लावून पाणी भरा असे सांगितले. याचे वाईट वाटुन व पुर्ण राजकीय सुड बुद्धीने ह्या पिण्याचा वादावरून हाणामारी झाली. ह्यात सैय्यद मुज्जफर अली, सै.लियाकत अली, यास माजी नगर सेवक महेमुद उर्फ मुन्ना ने तलवारीने मारहाण करून व त्याचे साथीदार टिपु शे.मुक्तार, अल्लारखा शे.मुक्तार, जावेद शे.मुक्तार, साजीद उर्फ प्रेम अहमद शे.मुक्तार उर्फ डॉन अहमद शेख सर्व राहणार गरीब नवाज कॉलनी शहादा यांनी हाताबुकांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली होती.