शहाद्यात विविध विकास कामांचे थाटात भूमिपूजन

0

शहादा । येथील विविध प्रभागांमध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमावेळी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ, जि.प. सदस्य अभिजित पाटील, बांधकाम सभापती संगीता चौधरी, नगरसेवक लक्ष्मण बढे, संदीप पाटील, संजय साठे रियाज कुरेशी, नगरसेविका उषा कुवर, रिमा पवार, रेखा पाटील, ज्योती नाईक, माजी नगरसेवक अरविंद कुवर, संजय चौधरी, भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाळे, डॉ. योगेश चौधरी, विनोद जैन, कीसन चौधरी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

या कामांचा आहे समावेश
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत प्रभाग क्रमांक 4 मध्ये 72 लाख 7 हजार 922 रूपये खर्च करुन मनीषा लॉजमागील गिरधर चौधरी यांच्या घरापासून ते गॅस गोडावूनपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे व प्रभाग क्रमांक एकमध्ये 31 लाख 12 हजार 786 रूपये खर्च करुन विजय कलाल यांच्या घरापासून ते डी.पी. कुलकर्णी व भीमवाडी वळसा घालून जॅकवेलपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे तसेच विकास निधी अंतर्गत 15 लाख 99 हजार 357 रूपये खर्च करुन राजू नाईक यांच्या घरापासून ते न.पा. बोअरिंगपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करने ही कामे होणार असून या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.