शहिद शुभम मुस्तपूरेला सामूहिक श्रद्धांजली

0

जळगाव । येथील खोटेनगर-साई मोरया ग्रुप व प्रमोद चौधरी फाउंडेशनतर्फे जम्मू काश्मीरच्या कृष्णा घाटीमध्ये कर्तव्य बजावत असतांना परभणी जिल्ह्यतील स्व. विर शहीद शुभम मुस्तपूरे हे पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झाले. त्यांना खोटे नगर स्टॉप येथे मेणबत्ती प्रज्वलीत करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रावेळी परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला.

यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार सुरेश भोळे, प्रमोद (रिंकुभाऊ) चौधरी, जयश्री पाटील,राहुल लोखंडे,प्रा. एस.केळकर, इच्छाराम गुरूजी, यशवंत कुलकर्णी, उमाकांत जाधव आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हितेश पाटील,सिद्धांत कदम,जयेश पाटील, अजय खरात,वैभव राजपूत,आकाश सुरळकर,सूर्यकांत भामरे,सागर बैसाने, भूषण चौधरी, प्रशांत गुजर,प्रसन्न जाधव, मंगेश साळंखे, सुरेश पाटिल, हरिष खामकर, मनीष सोनार यांनी कामकाज पाहिले.