औरंगाबाद : पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले संदीप जाधव यांच्या पार्थिवावर शनिवारी त्यांच्या मूळगावी केळगाव येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुर्दैव असे की जाधव यांच्या मुलाचा आज पहिला वाढदिवस होता. त्याच दिवशी मुलाला वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. यामुळे उपस्थित सार्यांनाच गहीवरुन आले तर संपूर्ण देश हळहळला.
संदीप जाधव यांचं पार्थिव शुक्रवारी औरंगाबादमध्ये आणण्यात आलं होतं. रात्री त्यांचे पार्थिव मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. आज सकाळी ते केळगावात आणण्यात आले. तेव्हा जाधव कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. अश्रूभरल्या डोळ्यांनी लोक संदीप जाधव अमर रहे अशा घोषणा देत होते.