भुसावळ । विविध सण- उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करण्यासाठी सर्व धर्मियांमध्ये एकोपा महत्वाचा आहे. काही अडचणी आल्यास संपर्क साधा आम्ही नक्की अडचणी सोडवू पोलीस प्रशासन देखील समाजाचे एक अंग असून समाजात शांतता प्रस्तापित करण्यासाठी सहकार्य करा, कुणालाही जाणून बुजून त्रास देणार नाही, मात्र कुणी उपद्रव केल्यास त्यावर कारवाई करण्यास हयगय केली जाणार नसल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिला.
व्यासपीठावर यांची होती उपस्थिती
रमजाननिमित्त शांतता समितीची बैठक नगरपालिका सभागृहात झाली़ याप्रसंगी ते बोलत होत़े. व्यासपीठावर नगराध्यक्ष रमण भोळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया, मुख्याधिकारी बाविस्कर उपस्थिती होते. प्रास्ताविक बाजारपेठचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे तर आभार शहरचे निरीक्षक वसंत मोरे यांनी मानल़े
पाहणी केल्यानंतर वेळ वाढवून देणार
रमजान काळात खडका रोड परिसरात दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरु असतात हि दुकाने वेळेवर बंद केल्यास गस्त करण्यास अडचण येणार नाही. आम्ही कुणाच्याही रोजगाराविरुध्द नाही, शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियमांचे पालन करुनच सण साजरे करावे, 22 रोजी खडका रोड परिसरातील पाहणी करुनच 23 व 24 रोजी दुकाने उघडी ठेवण्याची वेळ वाढवून दिली जाणार असल्याचे डिवायएसपी निलोत्पल यांनी सांगितले.
पथदिवे सुरु केली
जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला. तरी शहरात कुठेही शांततेला गालबोट लागलेले नाही. प्रत्येक सण येथे गुण्या गोविंदाने साजरे केले जातात. येथे सर्वांची नैसर्गिक मैत्री आहे. येथील नागरिकांच्या रक्तातच सद्भावना आहे. पालिका प्रशासनातर्फे शहरात बंद असलेली लाईट सुरु करण्यात येत असून खडका रोड परिसरातूनच याची सुरुवात करण्यात आली. तसेच स्वच्छता अभियान देखील सर्वप्रथम याच भागातून सुरु करण्यात आले. त्यामुळे पालिका प्रशासन देखील रमजान पर्वासाठी सज्ज असून समाजबांधवांना काही अडचणी आल्यास त्या सोडविण्याचे आश्वासन नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिले.