शांततेत उत्सव प्रत्येकाची जबाबदारी

0

शहादा । शहराचे नाव सामाजिक सलोखा ठेवणारे म्हणून असतांना किरकोळ घटनामुळे काळीमा फासला जातो. प्रत्येकाने मनात चांगली भावना ठेवुन सण ,उत्सव ,जयंती चांगल्या भावनेने साजरे केल्यास सामाजिक सलोखा रहातो असे आवाहन प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमेटीच्रा बैठकीत कार्रकर्ते व ग्रामस्थांशी बोलतांना केले.

प्रत्येक गोष्टीची दक्षता घ्या
अरविंद कुवर , सुरेंद्र कुवर , लोटन धोबी , अनिल भामरे , के. डी. पाटील यांनी विज वहातुक व इतर समस्या मांडल्या. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी बोलतांना ज्येष्ठांचा सल्ला हा चांगला रहातो उत्साह आवश्यक आहे. उत्सव शांततेत पार पाडणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. तर पोलीस निरिक्षक संजय शुल्क यांनी बोलतांना पवित्र वातावरणात उत्सव साजरे करा. प्रत्येक गोष्टीत दक्षता घ्यावी. पोलीस प्रशासनला सहकार्य करण्याची सर्वांची गरज आहे असे सांगितले.

यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील , आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर , उपविभागीर अधिकारी महारु पाटील ,पोलीस निरीक्षक संजय शुक्ल , मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ, उपअभियंता गिरासे, ज्येष्ठ नेते बापु जगदेव , समितीचे अध्यक्ष सुरेंद्र कुवर , शशिकांत कुवर , जि प सदस्य अभिजीत पाटील , अनिल भामरे , सुनिल गायकवाड , माजी नगरसेवक लोटन धोबी , के. डी. पाटील , गिरीश पाटील , पोलीस पाटील भगवान पाटील , नगर सेवक संदिप पाटील सह शांतता कमेटी सदस्यव पत्रकार बांधव उपस्थित होते.