श्री जैन युवा फाऊंडेशनतर्फे आयोजन;
जळगाव- ‘जागतिक शाकाहार दिवसनिमित्त’ भव्य शाकाहार प्रसार रॅली व सभेचे आयोजन 1 ऑक्टोबर रोजी श्री जैन युवा फाऊंडेशनमार्फत करण्यात आले आहे. विविध शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वृंद मोठ्या संख्येने सहभागी होतील सोबत सर्व समाजातील शाकाहार प्रेमी बंधु, भगिनी, विविध सामाजिक संस्थेमधील, मंडळातील आणि धार्मिक संस्थानमधील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. रॅलीमध्ये विविध प्रकारच्या झाँकी, संजीव देखावे, प्रबोधन, पर स्लोगन, बोर्ड इत्यादी राहणार आहेत. शाकाहार फक्त आहाराच्या दृष्टीनेच उपयुक्त नाही. तर त्यामुळे आपणास स्वस्थ प्रसन्न आणि ताण मुक्तजीवन जगण्यास देखील मदत होते. मांसाहार हे मनुष्याच्या आरोग्याच्या दृष्टीने जितके घातक आहे. त्यापेक्षा अधिक घातक पर्यावरणाच्या दृष्टीने आहे.
मांसविक्री संदर्भात देणार निवेदन
शाकाहार रॅली सकाळी 8.00 वाजता सुरु होईल. शाकाहार रॅलीचा मार्ग जी.एस. ग्राऊंड येथून सुरू होवून चित्रा चौक, राजकमल चौक, सुभाष चौक, गांधी मार्केट, टॉवर चौक, नेहरु चौक मार्गे खान्देश सेंट्रल येथे रॅलीचा समारोप करण्यात येणार असून त्याच ठिकाणी सकाळी 9.30 वाजेपासून सभा सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी यजुवेंद्र महाजन हे मार्गदर्शन करणार असून या सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. शेवटी जिल्हाधिकारी यांनी मांसविक्रीच्या बंदीबाबत निवेदन देण्यात येणार आहे.