शाडू मातीचा बाप्पा बनविण्याच्या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद

0
मधुकर बच्चे यांनी राबविला उपक्रम
चिंचवड : महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने के कॅलिग्राफीच्यावतीने चिंचवड येथे इको फ्रेंडली गणपती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. त्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या वेळी नगरसेवक सुरेश भोईर, महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे, संस्थेचे प्रमुख शरद कुंजीर, भाजपा रोजगार आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष सौरभ शिंदे, बाळकृष्ण नाईक, रोहिणी बच्चे, अर्चना कुंजीर, संस्थेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. या उपक्रमात 100 हून अधिक मुलांनी सहभाग घेऊन आकर्षक गणपती मूर्ती बनवल्या. अनेक पालकांनी या कार्यशाळेला उपस्थित राहून मुलांची कला बघण्याचा आनंद घेतला.
उपक्रम राबविले पाहिजे
यावेळी मधुकर बच्चे म्हणाले की, पर्यावरण समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून,पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी विविध संस्थानी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असे उपक्रम घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले. नगरसेवक सुरेश भोईर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व सदस्यांनी संयोजन केले.