शारिरीक शिक्षण विषयावर चर्चासत्र

0

भुसावळ। इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅन्ड सायन्स कॉलेजमध्ये शारिरीक शिक्षणाचे महत्व आणि फायदे या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र घेण्यात आले. एमबीएच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना शारिरीक शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले आणि त्याचे फायदे आपल्या जीवनात कसे होतात हे समजविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सराफ, सचिव संजय इंगळे उपस्थित होते.

व्यवस्थापक डॉ. बी.एन. गुप्ता यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. शारिरीक शिक्षण विभागाचे व्यवस्थापक प्रा. अब्दुल समीखान यांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवन जगण्यासाठी शारिरीक शिक्षणाचे महत्व आणि त्याचे फायदे यावर मार्गदर्शन केले. तसेच व्यायामामुळे शरिरावर कुठले सकारात्मक परिणाम होतात याची प्रात्याक्षिकासह माहिती दिली. प्रा. सादिक शेख यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी प्रा. तन्वीर सैय्यद, प्रा. यशश्री चौधरी यांनी सहकार्य केले.