मुंबई: शालिमार एक्स्प्रेसमध्यये स्फोटके आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही स्फोटके जिलेटीनच्या कांड्या असून या वस्तूंसह वायर, बॅटरी आढळून आल्या. या वस्तूंसह एक पत्र आढळून आले असून पत्रात भाजप सरकारविरोधी मजकूर आढळला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवर शालीमार एक्सप्रेस थांबून होती. बॉम्बविरोधी पथक या ठिकाणी दाखल झाले आहे. स्फोटके सापडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे निर्माण झाली आहे.