शालेय पोषण अधिक्षक व शिक्षकामध्ये फ्रि-स्टाईल

0

रावेर । पोषण आहार अधीक्षक अजित तडवी हे शिक्षकांना पोषण आहारा वरुन वारंवार त्रास देत असल्याने हा संपूर्ण प्रकार सांगण्यासाठी काही शिक्षकांचा गृप येथील पंचायत समिति सभापती चेंबर आला. त्यावेळी येथे पं.स.सदस्य जितेंद्र पाटील, पि.के. महाजन, हे आपल्या कार्यकत्यांशी गप्पा मारत होते त्यात शिक्षकांनपैकी लोहार्याचे शिक्षक भूषण चौधरी यांनी पोषण आहार अधीक्षक शिक्षकांना कसा त्रास देतो याचा पाढा वाचला.

आणि झाला कुस्त्यांचे मैदान
येथील पंचायत समिति हॉल ग्रामीण भागातून आलेल्या जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचे मुख्य ठिकान आहे. नवनिर्वाचित सदस्य येथे बसून आलेल्या जनतेच्या जाणून घेण्याचे काम करीत असतांना शिक्षक आणि पोषण आहार अधिकार्‍यांचा वाद चर्चेतुन मिटण्याचे काम सुरु होतात काही दोघांमध्ये कपडे-फाडाफाडी पर्यंत हाणामारी झाली.

पंचायत समितीत ‘बिहार राज’
रावेर शहरातील इतर कार्यालय सोडले तर पंचायत समिती रामभरोसे आहे. येथे आल्यानंतर बिहार मधिल एखाद्या कार्यालयात गेले की काय असेच वाटते. परंतु दोघे महाशयांमध्ये झालेल्या हाणामारीतून पंचायत समितीत बिहार राजच आहे हे सिध्द होते या पूर्वी येथे अप-डाऊन, वेळेवर न येणे, धिंगाणा घालणे, कामचुकारपणा करणे अनेक बाबी राजरोसपणे सुरु आहे परंतु येथील वरिष्ठ अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे याचे प्रमाण वाढतच आहे.

पोलिस स्टेशनला तक्रार
शिक्षक भुषण चौधरी यांना शालेय पोषण आहार अधिक्षक आजित तडवी यांनी मारहाणकरून धमकी दिली. श्री.चौधरी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात तडवी विरुध्द अदखलपात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. अशी महिती पो. नि. कौलास काळे यांनी दिली.या प्रकरणा बाबत चा अहवाल जिल्हापरिषदेच्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे पाठविण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले.