शालेय पोषण आहारामध्ये कुजलेल्या अळ्या, किडे; आ. एकनाथराव खडसे यांची शासनाकडे तक्रार

ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची आमदार खडसे यांची मागणी

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..

जळगाव राज्यभरात पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा असून, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याच्या या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार एकनाथराव खडसे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तसेच अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांकडे केली आहे. या आहारामध्ये कुजलेल्या अळया, किडे व खडे असल्याचा आरोप खडसे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे..

राज्यभरात शालेय पोषण आहार

अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील पहिले ते पाचवी या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक (कॅलरी) आणि १२ ग्रॅम प्रोटीन युक्त दुपारचे मध्यान्ह भोजन तसेच सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक कॅलरी आणि २० ग्रॅम प्रोटीन युक्त आहार देण्याच्या चांगल्या हेतूने ही योजना राबविण्यात येते. मात्र यामध्ये तांदूळ, चना, मसूरडाळ वाटाणा व मठ तसेच तूर डाळ कंत्राटदारामार्फत पुरविण्यात येत असतात. मात्र मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात अत्यंत निकृष्ट दर्जाचा कुजलेल्या अळ्या, किडे व खडे असलेला पोषण आहार कंत्राट्धारा मार्फत पुरवण्यात येत असल्याचे आमदार खडसे यांनी निवेदनात म्हटले आहे.

    @@@ मुक्ताईनगर शहरातील तु ल कोळंबे प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा नंबर 2 या प्राथमिक शाळांना आमदार एकनाथ खडसे यांनी भेटी दिल्या. त्यावेळी आमदार खडसे यांना निकृष्ट दर्जाचे शालेय पोषण आहाराचे धान्य तसेच मिरची पावडर मीठ हळद व अन्य पदार्थांच्या पिशव्यांमध्ये दहा ग्रॅम वजन कमी आढळून आले. एका पिशवी मागे दहा ग्राम वजन कमी जर राज्यामध्ये पुरवठा होत असलेल्या शालेय पोषण आहारात कोट्यावधीचा अपहार होत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे अशी मागणी शासनाकडे करण्यात आलेली असल्याचेही आमदार खडसे यांनी सांगितले

■ समिती गठीत करून चौकशीची करा….

शालेय पोषण आहार योजने अंतर्गत राज्यभरांतील शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींना पुरवले जाणारे अतिषय निकृष्ट दर्जाचे अन्न-धान्याच्या पुरवठ्या बाबत माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम या मत्रीद्वयाकडे लेखी तक्रार करून याबाबत कारवाई करण्याची लेखी मागणी तथा तक्रार केली आहे. याबाबत जळगाव जिल्हाधिकारी यांच्यासह शालेय शिक्षण विभाग सचिव महाराष्ट्र राज्य, शालेय शिक्षण विभागाचे आयुक्त, जळगाव जिल्हा परीषदेचे मुख्याधिकारी यांच्या कडेही लेखी व प्रत्यक्ष संपर्क करून तक्रारी केल्या आहेत.

@@@—अफलातून आदेश; ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रकार…… 29 ऑगस्ट रोजी शालेय पोषण आहार योजनेचे अधीक्षक अजित तडवी यांनी अफलातून आदेश काढून सर्व मुख्याध्यापकांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या साठा त्याचे व्हिडिओ किंवा फोटो कोणालाही काढू द्यायचे नाही असा आदेश काढून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला असल्याचा आरोपही आमदार खडसे यांनी यावेळी केला.