भुसावळ : पोलीस स्थापना निमित्त लोहमार्ग पोलीस ठाण्यातर्फे डि.एल.हिंदी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शस्त्रांसह पोलीस ठाण्यातील कामकाजाची माहिती देण्यात आली. याप्रसंगी लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या दालनात पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक शब्बीर शेख, पोलीस नाईक अंभोरे, एएसआय रेणूके, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील, पोलीस नाईक तडवी, पोलीस नाईक दर्योधन तायडे यांनी विद्यार्थ्यांना एसएलआर बंदूक, पिस्टल, मॅक्झीन, इनसंच, राउंड, कार्बनेड यांची सविस्तर माहिती दिली. तसेच पोलीस ठाण्यातील कामकाजाची विस्तृत माहिती देण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले. या कार्यक्रमाला डि.एल. हिंन्दी विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे
येथील खडका रोड भागातील एम.आय. तेली इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये पोलीस स्थापना दिन साजरा करण्यात आला. संस्थाध्यक्ष हाजी मुन्ना तेली अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे होते. पोलीस निरीक्षक सरोदे यांनी, विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. परवान्याशिवाय वाहने चालवू नये. अन्यथा पालकांवर गुन्हा होवू शकतो. सोशल मीडियाचादेखील दुरुपयोग करु नये, असे आवाहन केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक विजय नरवाडे, संस्थेचे संचालक शेख अय्युब शेख रहिमोद्दीन, शेख हुसनोद्दीन, हाजी साबीर शेख, मुख्याध्यापक सैय्यद वाजिद अली उपस्थित होते. सुत्रसंचालन बेनजिर शेख यांनी केले. यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी छोटू वैद्य, नंदू सोनवणे यांसह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी
परिश्रम घेतले.