भुसावळ- शाळकरी विद्यार्थिनीचा सातत्याने पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीत आरोपी विरेंद्र फुत्मसिंग पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शाळकरी विद्यार्थिनी शाळेत जात असताना शनिवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास आरोपीने विद्यार्थिनीचा रस्ता अडवत मोबाईल नंबर मागितला तर विद्यार्थिनीच्या वडिलांसह भाऊंनी आरोपीस जाब विचारला असता त्यांनाही धमकी देण्यात आली. विद्यार्थिनीच्या वडिलांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी विरेंद्र पाटील विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक निलेश वाघ करित आहेत.