शाळा समिती अध्यक्षाने केली शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी

0

पिंपरी-चिंचवड : संस्थेतील नोकरी टिकवायची असेल तर शरीरसुख दे, अशी मागणी शाळा समिती अध्यक्षाने शिशिकेकडे केली.हा प्रकार पिंपरी मधील भारतीय जैन संघटना शाळेत घडला. राजकीय दबावामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ लागला असा आरोप केला जात आहे. याप्रकरणी 45 वर्षीय शिक्षक महिलेने फिर्याद दिली असून त्यानुसार शाळा समिती अध्यक्ष आणि अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय दबाव आणि पोलिसांच्या सहकार्यामुळे आरोपींना अटकपूर्व जमीन मिळाला असल्याचा आरोप केला जात आहे.

भारतीय जैन संघटनेच्या शाळेतील प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जैन संघटनेच्या शाळेत शाळा समिती अध्यक्षाची काही महिन्यांपूर्वी नवीन निवड झाली. नवनिर्वाचित अध्यक्षाने एका शिक्षक महिलेकडे नोकरी टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी शरीरसुखाची मागणी केली. यासाठी महिलेने नकार दिला असता अश्‍लील बोलून महिलेचा विनयभंग केला. यासाठी शाळेतील तीन कर्मचारी आणि शिक्षकांनी सुद्धा शाळा समिती अध्यक्षाला साथ दिली. महिलेने आपल्या मागणीला कायम विरोध दर्शविल्याने अध्यक्षाने चिडून महिलेवर वेगवेगळे आरोप लावून नोकरीवरून काढून टाकले असल्याचे महिलेने फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ
विद्येच्या मंदिरात शिक्षकांबद्दल असे प्रकार होत आहेत. त्यामुळे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ज्या संस्थांमध्ये शिक्षक महिला सुरक्षित नसतील तिथे विद्यार्थ्यांची सुरक्षितता कशी असेल, असा प्रश्‍न पालकांच्या मनात उभा राहिला आहे.