शाळेच्या आवारात तरूणांच्या दोन गटात हाणामारी

1

जामनेर । शहरातील भुसावळ रोडवर असलेल्या शाळेच्या आवारातच तरूणांच्या दोन गटात मोठी हाणामारी झाली.यात एका तरूणास अधिक दुखापत लागल्यामुळे उपचारासाठी त्याला सरकारी दवाखान्यात करावे लागल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडली.त्याठिकाणी लागलीच पोलिस पोहाचल्याने वातावरण निवळले. जामनेर भुसावळ रोडवर असलेल्या इंदीराबाई ललवाणी विद्यालायाच्या आवारात सकाळी जामनेरपुरा भागातील व बजरंग पुरा येथील काही तरूणांच्या दोन गटात मोठी हाणामारी झाल्याची घटना घडली.दरम्यान यामधे एका तरूणास लाकडी दांड्याचा मार बसल्याने त्याला सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्याची वेळ आली. दोन गटात झालेल्या तरूणांच्या हाणामारीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

पोलिसात नोंद नाही
तसेच दोन्ही गटातील तरूणांपैकी एकही तरूण या शाळेत वा महाविद्यालयात शिक्षण घेत नसल्याचे समजते. वेळीच तिथे पोलिस पोहचल्याने वातावरण निवळून शांतता झाली. या घटनेबाबत पोलिस स्टेशनला कोणतीही नोंद झालेली नसून शहरात अजूनही काही शाळा महाविद्यालयांच्या आवारात अशा तरूण टोळक्यांमधे हाणामारीच्या घटना नेहमीच होत असल्याने याला पायबंद बसेल का असा प्रश्न बाहेर गाव व शहरातून शाळा, महाविद्यालायात शिक्षणासाठी येणार्‍या पाल्य व त्यांच्या पालकांकडून विचाराला जात आहे.

पोलिसांची नामुष्की
हाणामारी दरम्यान पोलिस त्याठिकाणी पोहचले असता.एका संशयित तरूणास चौकशीसाठी ताब्यात घेऊन जात असता.एका स्थानिक कार्यकर्त्याने पोलिसांसमक्ष त्या तरूणास गाडीखाली उतरून तेथून निघून जाण्यास सांगितले. यावरून एकंदरीत पोलिस प्रशासनाचा काही धाक राहीला आहे की नाही असा संभ्रम यावेळी निर्माण झाल्या शिवाय राहत नाही.