शाळेच्या गच्चीवर शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

0

राजकोट: शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना गुजरातमध्ये घडली आहे. पलिताणा येथे एका शिक्षकाने कन्या शाळेच्या छतावर आठवीत शिकणार्‍या मुलीवर बलात्कार केला आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी शिक्षकाला चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
पलिताणा येथील कन्या शाळेतील शिक्षकाने मधल्या सुट्टीत मुलीला टेरेस स्वच्छ करण्यास सांगितले. त्यानंतर तोही तिच्या पाठीमागे गेला. टेरेसवरील दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला. भेदरलेली मुलगी रडतच घरी गेली आणि घटनेबाबत पालकांना सांगितलं. संतप्त पालकांनी नराधम शिक्षकाला चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पलिताणा पोलीस ठाण्यात त्यांनी शिक्षकाविरोधात तक्रार नोंदवली आहे.