शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत

0

शहादा । येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयात आज रोजी नवीन शैक्षणिक वर्ष 2018-19 च्या शुभारंभ विद्यार्थी व पालकांचे गुलाबपुष्प देवुन व पुस्तकांचे वाटप करुन करण्यात आला. मुख्याध्यापक संजय राजपुत यांच्या हस्ते विद्यार्थाना सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत देण्यात आलेले पुस्तके वाटप करण्यात आली याप्रसंगी उपप्राचार्य आर. जे. रघुवंशी, पर्यवेक्षक सुनिल सोमवंशी सह शिक्षक उपस्थित होते. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थी व पालकांना मुख्याध्यापक संजय राजपुत यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अध्यापनाकडे लक्ष द्यावे. पालकांचे स्वप्न पुर्ण करावे शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे असे आवाहन केले. शाळेत प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकांनीही गर्दी केली होती. आपल्या पाल्यास सोडतांना त्यांच्या मनामध्ये घालमेल सुरु होती.

गटशिक्षणाधिकार्‍यांची प्रमुख उपस्थिती
शहादा येथील महिला मंडळ संस्थेच्या व्हॉलंटरी प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थी व पालकाचे मान्यवरांच्याहस्ते गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. प्रारंभी वृक्षारोपण करुन विद्यार्थ्यांना मोफ त पाठ्यपुस्तके देण्यात आले. यावेळी गट शिक्षणाधिकारी ए.डी.पाटील, विस्तार अधिकारी उषाबाई पेढारकर, अ‍ॅड. राजेश कुलकर्णी, प्रभाकर उमराव, मुख्याध्यापिका ताराबाई बेलदार, प्राचार्या नम्रता पाटील, प्रतिभा बोरसे, सुनिता पाटील, ललिता राठोड, विजया पाटील, रंजना पाटील, मिना ठाकुर, वृक्षाली भावसार, पुष्पा चौधरी अर्चना पवार, निर्मला दुसाने, नयना पाटील, भावना जव्हेरी, मनिषा पाटील आदी.

पालकांची मोठ्या संख्येेने उपस्थिती
शहादा येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी व पालकांचे गुलाबपुष्प देवुन व पुस्तकांचे वाटप करुन करण्यात आला. मुख्याध्यापक संजय राजपुत यांच्या हस्ते विद्यार्थाना याप्रसंगी उपप्राचार्य आर. जे. रघुवंशी, पर्यवेक्षक सुनिल सोमवंशी सह शिक्षक उपस्थित होते. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेठ व्ही के शहा विद्यामंदिरात बालवाडी ते उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे स्वागत प्रवेशद्वारापासुन गुलाब पुष्प देवुन करण्यात आले यावेळी चेअरमन मोतीलाल पाटील , हिरालाल पाटील , प्रा. ए. के. पटेल , प्राचार्य सी. व्ही चौधरी , एस. जे. पाटील आदी उपस्थित होते.