पहूर । येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ शनिवारी सकाळी देशी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा मोठा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. शाळेजवळ घडलेला प्रकाराची कसून चौकशी करावी यासाठी युवा सेना व जि.प. शाळा पाळधी शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भक्तराज कुमावत यांनी पहूर पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
पोलीस निरीक्षकांनी आपला शब्द पाळावा
युवा सेना पाळधीने दिलेल्या निवेदनानुसार शहरात सर्रास होत असलेले अवैध धंदे बंद करा, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदन देण्यात आला आहे. या निवेदनावर उपजिल्हा प्रमुख भरत पवार, तालुका उपप्रमुख नवल सुरवाडे, शहरप्रमुख अनिल चौधरी, रवी पांढरे यांच्या स्वाक्षर्या असलेले निवेदन दिलेले आहे. पहूर पाळधी परिसरात संपूर्ण अवैध धंदे बंद आहेत असे दिवाळीच्या सुमारास मोहन बोरसे यांचे वक्तव्य होते. अवैध धंदे बंद असतांना हा अशा प्रकारचा निंदनीय प्रकार घडतोच कसा? सट्टा, पत्ता, दारू, गुटखा सर्रास चालू असल्याची चर्चा पहूर पाळधी परिसरात जोर हात आहे.