शासकीय अनास्थेने बळी पडलेल्यांना श्रद्धांजली

0
पुणे :  बुलंद शहरातील पोलीस अधिकारी सुबोधकुमार सिंग, आग्रा येथील विद्यार्थिनी कुमारी संजाली यांची हत्या, बीडमधील ऑनर किलींगला बळी पडलेले सुमित वाघमारे, शासकीय अनास्थेने आत्मदहन केलेले तौफिक शेख यांना युवक क्रांती दल आणि जागरूक पुणेकर समिती यांच्या वतीने सोमवारी सभेत श्रद्धांजली वहाण्यात आली.
या सर्व घटनांमुळे संवेदनशील भारतीय नागरिकांचे मन व्यथित झाले आहे असे सभेत वक्त्यांनी सांगितले. या सभेला अन्वर राजन, प्रशांत कनोजिया, संदिप बर्वे, दिलीप मोहिते, नागेश भोसले, प्रकाश शिंदे, सागर आवटे, रोहन जैसी, माजी नगरसेविका रुपाली पाटील, जांबुवंत मनोहर, दिलीप सिंग, विश्वकर्मा, अप्पा अनारसे, मयुरी शिंदे आदी सहभागी झाले होते.