शासकीय कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा विचाराधीन – दीपक केसरकर

0

मुंबई :केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी सरकारने २०१७ मध्ये माजी सनदी अधिकारी के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती नेमली होती. त्या समितीने राज्य सरकारचे सर्व विभाग प्रमुख, सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संघटनांची निवेदने विचारात घेतली. तसेच काही संघटनांच्या प्रतिनिधींचे व विभागप्रमुखांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. सर्व संबंधित प्रशासकीय विभागांशी समितीने विभागवार बैठका घेतल्या. या बैठकांचे कामकाज गेल्या ऑक्टोबर महिन्यात पूर्ण झाले आहे’, असे केसरकर म्हणाले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री श्रीकांत देशपांडे, नागो गाणार यांनी सहभाग घेतला.