मुक्ताईनगर। शहरातील तहसील आवारामधील वर्क स्टेशन नावाने तलाठ्यांकरीता सुरु करण्यात आलेल्या कार्यालयात विजेचा अपव्यय होत असल्याचे दिसून येते. यामध्ये कार्यालयात कुणीही हजर नसताना देखील पंखे आणि लाईट सुरुच ठेवून कर्मचारी सैरावैरा झालेले होते. ग्रामीण भागात भारनियमनामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र शहरात विज पुरवठा सुरळीत असून देखील शासकीय कार्यालयांमधील कर्मचार्यांच्या निष्काळजीपणामुळे विजेचा अपव्यय होत असतो.
भारनियमन असताना सरकारी कर्मचार्यांची उधळपट्टी
या कार्यालयामधील पंखे आणि लाईट हे चालु असुन तिथे एकही तलाठी किंवा कोतवाल हजर नव्हते, खेडेगावातुन शेतकरी हा उन्हातानात तेथे येउन पाहुन जातो व तेथील आजूबाजुला उभे असणार्या लोकांना विचारतात जर उत्तर मनासारखे मिळाले नाही तर तलाठी यांना फोन करतो. सुरवातीला तलाठी महाशय फोन उचलतच नाही. उचलला तर सांगतात फोन चार्जींगला लावला शेतर्यांचे कामे होत नसताना हे महाशय वर्क स्टेशन मधुन पंखे लाईट चालु ठेवुन निघुन जातात. एकीकडे भारनियमनाचे संकट असतांना सरकारी कर्मचारी जर असा विजेचा गैरवापर करतील तर कसे चालेल शेतकरी वर्गामध्ये अशी चर्चा रंगली होती.