नंदुबार-येथे सुरू असलेल्या शासकीय संगणक टायपिंग परीक्षेचा ताबा संगणक चालकांनी घेतल्याने या परीक्षा प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. खाजगी संगणक संचालक आपल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी धडपड करतांना दिसून आले आहे. पहिल्या सत्रातील परीक्षेत माध्यमिक शिक्षण विभागातील एकही अधिकारी परीक्षा केंद्रांकडे न फिरकल्याने शासकीय नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या संगणक परीक्षेवर नियंत्रण तरी राहिले कुणाचे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे? काही केंद्रावर डमी विद्यार्थी देखील बसविण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बाबतची तक्रार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्तांकडे करण्यात आली आहे. आज ५ जानेवारी रोजी नंदुरबार येथील तीन केंद्रावर ही परीक्षा घेतली जाते आहे.