जळगाव-जळगाव शहरात असलेल्या जळगाव जिल्हा शासकीय तांत्रिक विद्यालय कर्मचारी पतपेढीच्या चेअरमनपदी शासकीय तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.दिलीप लक्ष्मण बोंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रा. बोंडे हे २७ वर्षांपासून पतपेढीच्या संचालक मंडळावर आहे. आता तिसऱ्यांदा त्यांची चेअरमन म्हणून निवड करण्यात आली आहे. तर व्हाईस चेअरमन म्हणून शासकीय तांत्रिक विद्यालय वरणगाव येथील सहायक अधिव्याख्याता तुषार जावळे यांची निवड करण्यात आलेली आहे. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस.बी.वाघमारे, शा.तां.विद्यालय जळगावचे मुख्याध्यापक डी.ए.महाजन, शा.तां.विद्यालय वरणगावचे मुख्याध्यापक लेले, एस.ए.गायकवाड, एच.पी.चौधरी आदींसह शिक्षकवृंद, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.