शासनाचे एकच लक्ष्य ‘13 कोटी वृक्ष अभियान’ ; वनविभागातर्फे वृक्षारोपांचे वाटप

0

भुसावळासह रावेरात वृक्षांची लागवड : वृक्ष जगविण्याचाही मान्यवरांनी केला संकल्प

भुसावळ/रावेर- शासनाच्या माध्यमातून दरवर्षी राज्यभरात वृक्षरोपे लागवड अभियान राबवले जात आहे. यंदाही शासनाने एकच लक्ष्य 13 कोटी वृक्ष लागवड अभियान राबवण्यास सुरूवात केली आहे. यासाठी शासनाच्या वनविभागाच्या माध्यमातून वृक्षरोपांचे वितरण सुरू केले असून सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये ,पर्यावरण प्रेमी अशा विविध सेवाभावी संस्थाना रविवारी यावल रोडवरील वनविभागाच्या तपासणी नाक्यावर मुक्ताईनगर वनपरीक्षेत्र वनविभाग जळगावच्या माध्यमातून वृक्षरोपे वितरीत करण्यात आली.

न्यायालयात रविवारी झाली वृक्षरोपांची लागवड
भुसावळ न्यायालयातील आवारात रविवारी सकाळी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी.डोरले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षरोपणाच्या कार्यक्रमास सुरूवात झाली. यावेळी न्यायाधीश पी.आर.सित्रे, जिल्हा न्यायाधीश आर.आर.भागवत, दिवाणी न्यायाधीश एस.एन.फड, सहदिवाणी न्यायाधीश एस.डी.गरड, एस.एल.वैद्य, पी.व्ही.चिद्रे यांनीही वृक्षरोपण कार्यक्रमात सहभागी होवून वृक्षरोपण केले. यावेळी भुसावळ बार असोसिएशनचे अ‍ॅड.मतीन अहमद, अ‍ॅड.एन.डी.चौधरी, अ‍ॅड.एस.एम.घोलप, अ‍ॅड.संजय चौधरी, अ‍ॅड.एस.एम घोलप, अ‍ॅड.निलेश राठोड, अ‍ॅड.राजेश उपाध्याय, अ‍ॅड.पी.एम.वर्मा, अ‍ॅड.वसीम खान, अ‍ॅड.विजय खडसे, सहायक अभियोक्ता अ‍ॅड.अजिज शहा, अ‍ॅड.सुनील राऊत, अ‍ॅड.प्रफुल्ल पाटील उपस्थित होते. न्यायालयीन कर्मचारी अधीक्षक डी.टी.वाणी, पी.जी.नगरकर, सहायक अधीक्षक एस.पी.तायडे, वरीष्ठ लिपिक एल.एल.तेलंग, कनिष्ठ लिपिक किशोर पिंगाणे, चारूदत्त देशमुख, डी.जी.इंगळे यांच्यासह न्यायालयातील पुरूष व महिला कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले.

वन महोत्सवास रावेर तालुक्यात शुभारंभ
रावेर- तालुक्यात वन महोत्सवास सुरवात झाली. रावेर न्यायालयापासून या मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. वृक्ष लागवड वनमहोत्सव सोहळ्याचे उदघाटन न्यायालय परीसरात न्या.अनुप जयस्वाल, न्या.रवींद्र राठोड यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी वन परीक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी प्रास्ताविकात मोहिमेविषयी सांगून वन महोत्सवात सहभागी होऊन वृक्ष संवर्धन करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनदेखील केले. यावेळी तहसीलदार विजय ढगे, गटविकास अधिकारी हबीब तडवी, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, श्रीराम फौंडेशनचे सचिव दीपक नगरे, विजय महाजन, योगेश गजरे, आर.एन. चौधरी, विपीन गडे, भास्कर निळे, जगदीश महाजन, धनराज पाटील, उदय सोनार, एम बी चौधरी, प्रकाश महाजन, निलेश महाजन यांच्यासह वकील मंडळी , अधीक्षक पी.एस.गडे, राजेंद्र कोल्हे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आभार सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल अर्षद मुलानी यांनी मानले.

जुनोना येथे वृक्ष लागवड
रावेर- तालुक्यातील जुनोना येथील राखीव वन जमिनीवरदेखील लागवडीस प्रारंभ करण्यात आला. याठिकाणी तहसीलदार विजय ढगे यांच्या हस्ते स्व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वनक्षेत्रपाल राजेंद्र राणे यांनी वन विभागाच्या योजना समजावून सांगितल्या तर अर्षद मुलानी यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी बांधावरील वृक्ष संवर्धनासाठी असलेल्या योजना सांगितल्या. दीपक नगरे यांनी सजीवांसाठी वृक्ष संवर्धन कसे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी वन संरक्षण समिती अध्यक्ष कैलास जाधव, उपसरपंच चरणसिंग पवार,अजमल पवार, ग्रामसेवक सी जी चौधरी, दीपक कोळी, अफरीम तडवी, वनपाल एस.के.सोनवणे, वन कर्मचारी प्रकाश सलगर, सविता वाघ, गजानन आढावणे, कैलास चव्हाण, अजमल पवार, उत्तम पवार, आर.डी.भामरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.