शासनाने भोई समाजाला सवलती द्याव्यात : भाऊसाहेब बावणे

0

राष्ट्रीय भोई समाजातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी : देशात भोई समाज बहुसंख्येने राहत आहे. पण तो संघटित नसल्यामुळे समाज्यावर सतत शासन दरबारी अन्याय सहन करावा लागतो. समाजाला संघटित करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने इतर समाजाप्रमाणे भोई समाजाला देखील सवलती द्याव्यात, असे मत राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावणे यांनी दापोडी येथे व्यक्त केले. दापोडी येथील नरवीर तानाजी पुतळा या ठिकाणी राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल संघटनेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष दिलीप गवते, प्रदेश महासचिव अभिषेक घटमाळ, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, नगरसेविका स्वाती काटे, नगरसेवक राजू बनसोडे, महिला मंच प्रदेश अध्यक्षा उज्ज्वला वाघवले, पुणे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब मोरे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा परिनिता तारु, पुणे जिल्हा विभाग प्रमुख बाळासाहेब गवते, युवा मंच प्रदेश महासचिव तुषार साटोळे, पुणे जिल्हा मच्छीमार संघ अध्यक्ष रामदास भोकरे, पुणे जिल्हा युवा मंच अध्यक्ष ज्योतिबा शिर्के आदी उपस्थित होते.

संघटन मजबूत होणे गरजेचे
भाऊसाहेब बावणे पुढे म्हणाले की, भोई समाजाला संघटित करणे गरजेचे आहे. यामुळे महाराष्ट्रासह देशात मिशन 2020 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात व तालुका संघटित करुन संघटनेचे विचार घरोघरी पोहचविण्याचे काम संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे. आपला समाज हा आज विखुरला गेला आहे. याला एकत्र करण्यासाठी आपण एकत्र येऊन देशात आपले संघटन मजबूत गरजेचे आहे. संपुर्ण देशभर समाजजोडो अभियानास सुरवात केली आहे. भोई समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी प्रयत्न संघटना मार्फत करण्यात संघर्ष आहे. या साठी 65 वर्षे पासून सामाजिक संघटना पाठपुरावा करत आहे.