सोयगाव : शेतकर्यांच्या प्रश्नावर जनआक्रोश मोर्चातून शासनाने मार्ग न काढल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी 16 जनआक्रोश मोर्चाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला सोयगावला आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. जिल्हाभरातील जनआक्रोश मोर्चाच्या आगामी रणनीती ठरविण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी सोयगावातून चक्रे फिरवून आंदोलनाची आगामी रणनीती आखली आहे.
यामध्ये रविवारी 26 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान दिनानिमित्ताचे औचित्य साधून काँग्रेसच्या आजीमाजी आमदार,खासदार यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा,खानदेश आणि विदर्भात जनआक्रोश यात्रा काढण्यात येवून या विभागातील प्रमुख रस्ते सरकारमधील मंत्र्यांसाठी बंद करण्यात येवून तब्बल 16 दिवसाच्या कालखंडानंतर ही यात्रा हिवाळी अधिवेशनात या यात्रेचा समारोप करण्यात येवून अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नसल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.दरम्यान मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातून निघणार्या या जनआक्रोश यात्रेचे रणनीती 16 सोयगावात आखण्यात आल्याने सोयगावला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. तालुकाध्यक्ष प्रभाकर काळे, नंदू सहारे, अब्दुल समीर, संदीप काळे, लतीफ शहा, अक्षय काळे आदींची उपस्थिती होती.