शासनाने शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी

0

जळगाव । संपुर्ण जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांना अन्नधान्य व इतर शेती माल पिकविण्यासाठी भरपूर खर्च येतो. दिवसेंदिवस वाढती महागाई लक्षात घेता शेतकर्‍यांना शेतीच्या पूर्व मशागतीसाठी, लागवडीसाठी, पीक जोपासण्यासाठी, पीक काढणीच्या संपुर्ण प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी शेतकर्‍यांना भरपूर प्रमाणात गुंवतणूक करावी लागते.कुटूंबाचा गाडा कसा चालवावा, शिक्षणाचा, दवाखान्याचा, लग्नाचा खर्च वगैरे कुठून आणि कसा करायचा अशा ह्या दृष्टचक्रात शेतकरी वर्ग वर्षानुवर्षे अडकला आहे.

शेतकर्‍यांसाठी उपाययोजनांची मागणी
त्याला ह्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वप्रथम कोणताही लहान मोठा भेदभाव न करता सर्वांना सरसकट कर्जमाफी करावी कारण लहान शेतकर्‍यांपेक्षा मोठा शेतकरी जास्त अडचणीत आहे तसेच शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही ह्याकरीता गंभीरतेने विचार करुन धोरणात्मक बदल करुन शेतकर्‍यांनी गुंतविलेले पैसे परत मिळण्यासाठी उपाय योजना कायमस्वरुपी आखावी अशी आग्रहाची मागणी भारत कृषक समाजातर्फे चेअरमन डॉ.प्रकाश मानकर, डॉ.रमेश ठाकरे, प्रशांत चौधरी, वसंतराव महाजन, जगतराव पाटील, शेषराव पाटील, गोविंद पाटील ह्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. मग ह्या गुंतवणुकीसाठीचे पैसे बँकेतून पीक कर्ज, प्रायव्हेट कर्ज, सावकारी कर्ज वगैरे माध्यमातून जमा करुन मोठ्या आशेने तो शेतीला लावतो तेव्हा शेतकर्‍यांची माफक अपेक्षा असते की, गुंतवणूकीचे पैसे पिकाच्या माध्यमातून परत मिळावे परंतू नैसर्गिक आपत्ती, शासनाचे चुकीचे धोरण, व्यापारी दलालांची मनमानी, प्रशासकीय उदासीनता वगैरे कारणांमुळे शेतकर्‍यांनी गुंतवलेले पैसेही परत मिळत नसतील तर मग शेतकर्‍यांनी काय करावे? घेतलेल्या पैशांची परतफेड कशी करावी.