शास्तीकर माफीवरून महापालिकेत राडा!

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेत 100 टक्के शास्तीकर माफ करण्रासाठी महापौरांच्रा आसनासमोर गोंधळ घालणारे विरोधी पक्षनेते रोगेश बहल रांच्रासह राष्ट्रवादी काँग्रेसच्रा चार नगरसेवकांना पुढील तीन सर्वसाधारण सभांसाठी गुरुवारी निलंबित करण्रात आले. निलंबन कारवाईनंतर सभागृहाबाहेर पडणार्‍रा महापौर नितीन काळजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्रा नगरसेवकांनी घेराव घालण्राचा प्ररत्न केला. निलंबन कारवाई मागे घेण्राच्रा मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्रा नगरसेवकांनी महापौर कार्रालरासमोर जोरदार आंदोलनही केले. विरोधी पक्षनेते रोगेश बहल, मंगला कदम, मरूर कलाटे आणि दत्ता साने यांना महापौरांनी निलंबित केले आहे. तसेच एक हजार चौरस फुटापर्रंतच्रा अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफीचा ठरावही सभेत करण्रात आला आहे.

आ. जगताप, आ. लांडगेंसह मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. राज्र सरकारने राज्रभरातील 600 चौरस फुटांपर्रंतचा घरांचा शास्तीकर माफ करण्राचा निर्णर घेतला आहे. त्राचे अवलोकन करण्राचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्रात आला होता. त्राला ज्रेष्ठ नगरसेविका माई ढोरे रांनी एक हजार चौरस फुटापर्रंतच्रा अनधिकृत बांधकामांचे शास्तीकर माफ करण्राची उपसूचना मांडली. त्रावर सर्वपक्षीर नगरसेवकांनी आपली मते मांडली. बहुतांश नगरसेवकांनी सर्वच अनधिकृत बांधकामांचे शास्तीकर माफ करावे, अशी मागणी केली. स्थारी समितीच्रा अध्रक्षा सीमा सावळे रांनी सरकार अनधिकृत बांधकामे अधिकृतचा निर्णर घेणार असल्राने अनधिकृत हा शब्दच वगळला जाणार असल्राचे स्पष्ट केले. तसेच शास्तीकर माफीचा निर्णर घेण्रासाठी पाठपुरावा करणारे भाजपचे शहराध्रक्ष व आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे आणि हा निर्णर घेणारे मुख्रमंत्री देवेंद्र फडणवीस रांच्रा अभिनंदनाचा ठराव मांडला. पक्षनेते एकनाथ पवार रांनी भाजपचे सरकार जे बोलते ते करते, असे सांगितले. शहरातील नागरिकांना राष्ट्रवादीने अनधिकृत बांधकामांच्रा जोखडात बांधून ठेवल्राचे ते म्हणाले. अनधिकृत बांधकाम प्रश्‍नाचे भाजप राजकारण करणार नाही, पण निर्णर घेतल्रास त्राचे श्रेर निश्‍चितपणे घेणार असल्राचेही त्रांनी सांगितले. त्रानंतर महापौर नितीन काळजे रांनी उपसूचनेसह शास्तीकरचा प्रस्ताव मंजूर केला.

गोंधळ घालणार्‍या नगरसेवकांना बाहेर काढले
शास्तीकराचा प्रस्ताव मंजूर झाल्रानंतर राष्ट्रवादीच्रा नगरसेवकांनी त्रावर मतदान घेण्राची मागणी करत, सभागृहात गोंधळ घालण्रास सुरुवात केली. माजी महापौर रोगेश बहल, मरूर कलाटे आणि दत्ता साने हे महापौरांच्रा अंगावर धावून गेले. साने रांनी तेथील कुंड्या फोडण्राचा प्ररत्न केला. सभा कामकाज निरमानुसार होण्रासाठी नगरसेवकांनी सहकार्र करावे, असे महापौरांनी वारंवार विनंती केली. मात्र राष्ट्रवादीच्रा नगरसेवकांनी गोंधळ घालणे सुरूच ठेवले. त्रामुळे महापौरांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब केली. तहकुबीनंतर सभा पुन्हा सुरू झाल्रानंतर राष्ट्रवादीने पुन्हा गोंधळास सुरुवात केली. महापौरांनी समज देऊनही त्रांनी गोंधळ थांबविला नाही. त्रामुळे पक्षनेते एकनाथ पवार रांनी माजी महापौर रोगेश बहल, मंगला कदम, दत्ता साने आणि मरूर कलाटे रा चार नगरसेवकांचे निलंबन करण्राची सूचना केली. त्रानंतरही महापौरांनी गोंधळ थांबविण्राची सूचना राष्ट्रवादीच्रा नगरसेवकांना केली. तरीही गोंधळ थांबला नाही. त्रामुळे महापौर नितीन काळजे रांनी बहल, कदम, साने व कलाटे रांचे तीन सभांसाठी निलंबन केले. निलंबन सहन न झाल्राने मंगला कदम रांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. महापौरांच्रा आदेशानंतरही निलंबन झालेले राष्ट्रवादीचे नगरसेवक सभागृहाबाहेर जात नव्हते. त्रामुळे रा चौघांनाही सुरक्षारक्षकांनी अक्षरशः हाकलून सभागृहाबाहेर काढले.

महापालिकेत राष्ट्रवादी नगरसेवकांची तुफान घोषणाबाजी
निलंबन कारवाईनंतर राष्ट्रवादीचे सर्वच नगरसेवक सभागृहाबाहेर निघून गेले आणि सभेच्रा दरवाजासमोर बसून जोरदार घोषणाबाजी केली. त्राला दाद न देता सत्ताधारी भाजपने सभेचे कामकाज चालविले. शिवसेनेने राष्ट्रवादीच्रा गोंधळी नगरसेवकांच्रा निलंबनाचे स्वागत केले. मात्र नंतर शिवसेनेचे सर्व नगरसेवक सभागृहाबाहेर निघून गेले. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार रांनी राष्ट्रवादीच्रा गोंधळी कृत्राचा निषेध केला. सभागृहात राष्ट्रवादीचे चार-चार माजी महापौर आहेत. तरीही रा पक्षाच्रा नगरसेवकांनी महापौरांच्रा अंगावर धावून जाण्राचे कृत्र करून निवडणुकीतील अपरश पचविता रेत नसल्राचे दाखवून दिल्राचे ते म्हणाले. राष्ट्रवादीने जनाची नाही, तर मनाची तरी लाज बळगावी, असा टोलाही पवार रांनी लगावला. शिवसेनेने आपल्रा भूमिकेवर ठाम राहावे, असा चिमटाही त्रांनी काढला. सभेनंतर राष्ट्रवादीच्रा नगरसेवकांनी महापालिका मुख्रालरात तुफान घोषणाबाजी केली. मात्र महापौर काळजे रांनी अशा गोंधळी नगरसेवकांचे निलंबन आपण मागे घेणार नसल्राचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बुरे दिन आलेत! लोकशाहीचा गळा घोटला : योगेश बहल
आम्ही सभागृहात कोणतेची चुकीचे कृत्य केले नाही. त्यांनी 600 फुटापर्यंत शास्तीकर माफीचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आम्ही नियमाप्रमाणे मतदान घेण्याची मागणी केली. सभागृहाच्या नियमाप्रमाणे चार सदस्यांनी मतदानाची मागणी केली तर मतदान घ्यावेच लागते. परंतु, यांनी अक्षरशः लोकशाहीचा गळा घोटला. महापौरांना काही कळत नाही. ते सीमा सावळे सांगतात तसेच ऐकतात. त्यांनी सीमा सावळेंच्या सांगण्यावरून आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले व मतदान न घेता ठराव मंजूर केला. हे चुकीचे आहे. संपूर्ण शास्तीकर माफ करावा, अशी आमची मागणी आहे. एकाच बांधकामावर तुम्ही दोनवेळा कर कसा घेता? असे आम्ही त्यांना विचारत होतो. तर त्यांनी सभागृहात पहिल्यांदाच सुरक्षा रक्षक बोलावले व आम्हाला सभागृहातून बाहेर काढले. पहिल्याच सभेत त्यांनी दंडेलशाही दाखवून दिली. त्यामुळे शहरवासीयांचे बुरे दिन सुरू झाले आहेत.
योगेश बहल, विरोधी पक्षनेते