शास्त्रीय संगीत हाच सर्व संगीताचा मूळ पाया

0

डॉ.विकास कशाळकर ; संचारीभाव, विभाव, व्यभिचारी भाव यांची प्रात्याक्षिकाव्दारे विद्यार्थ्यांना माहिती ; भुसावळच्या पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावर संगीत कार्यशाळा ; 89 शिबिरार्थींचा सहभाग

भुसावळ- शास्त्रीय संगीत हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाला चिरतरुण ठेवते. शास्त्रीय संगीत हाच मूळ सर्व संगीताचा पाया असून या महाविद्यालयात ील संगीत विभागाने आपली यशाची उज्वल परंपरा कायम ठेवली असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम कलाकार डॉ.विकास कशाळकर (पुणे) यांनी येथे केले. शहरातील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात संगीत विभागातर्फे नुकत्याच झालेल्या एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे होत्या.

तणाव मुक्तीसाठी संगीत उत्तम माध्यम -प्राचार्य
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे म्हणाल्या की, दैनंदिन ताणतणावातून मुक्ती मिळविण्यासाठी संगीत हे उत्तम माध्यम आहे. व्यासपीठावर तबला संगतकार माधव मोडक, पुणे तर संवादिनीवर संगत करणार्‍या शुभांगी भावसार, पुणे तसेच उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, संगीत विभाग समन्वयक राजेश पुराणिक उपस्थित होते. प्रास्ताविक राजेश पुराणिक यांनी केले. प्रथम सत्रात ‘39 राग, सौंदर्य 39’ या विषयावर डॉ. कशाळकर यांनी काही रागांचे आलाप सादर केले. संचारीभाव, विभाव, व्यभिचारी भाव यांची प्रात्याक्षिकाव्दारे माहिती दिली. सात
स्वरांची निर्मिती कशी झाली याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
दोन्ही सत्रांचे चर्चासत्र आटोपल्यावर डॉ.विकास कशाळकर यांचे सुश्राव्य गायन झाले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक, ताप्ती एज्युकेशन सोसायटी, प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे तसेच माजी प्राचार्य डॉ.व्ही.सी.कोल्हे उपस्थित होते. आपल्या सुश्राव्य गायनात डॉ. कशाळकर यांनी राग भिमपलासी सादर करून नंतर स्वतः स्वरबद्ध केलेला अभंग सादर केला. नंतर रागभैरवी मध्ये ‘बाजू बंद खुल खुल जाय’ याने कार्यक्रमाची सांगता केली. त्यांना तबला संगत माधव मोडक, पुणे तर संवादिनीवर शुभांगी भावसार, पुणे तसेच तानपुरा संगत कुंदन तावडे, प्रियंका पाटील, जितेश मराठे यांनी दिली तर महेंद्र सूर्यवंशी यांनी झांज वाजवून संगत दिली.

यांनी घेतले परीश्रम
यशस्वीतेसाठी डॉ.ए.डी.गोस्वामी, डॉ.जे.एफ.पाटील, डॉ.ममता पाटील, डॉ.रुपाली चौधरी, प्रा.पुरुषोत्तम महाजन, प्रा.एस.टी.धुम, संगीत विभाग समन्वयक राजेश पुराणिक, प्रा.राजश्री देशमुख, प्रा.कुंदन तावडे, प्रा.रेणुका देशपांडे, प्रा.सारीका मुळे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन प्रा.राजश्री देशमुख यांनी तर राजेश पुराणिक यांनी आभा मानले. कार्यशाळेस जळगाव, भुसावळ, नाशिक, पाचोरा, धुळे, मलकापूर, बुलढाणा, अकोला, वरणगाव, दीपनगर, आसाम येथून जवळजवळ विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक असे 89 शिबिरार्थी उपस्थित होते.