शास्त्री उवाच! विराट कोहलीच सर्वोत्तम

0

सेंच्युरियन । भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहली हा सर्वश्रेष्ठ खेळाडू ठरला असल्याचे म्हटले आहे. विराट कोहली, जो रूट, केन विल्यम्सन आणि स्टीव्हन स्मिथ यांना वर्तमान काळात जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून ओळखले जाते. पण, शास्त्री यांचे म्हणणे असे की, कोहलीला कोणीही पर्याय ठरू शकत नाही. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या मालिकेत भारतीय संघाने मिळवलेल्या यशाबाबत विचारले असता शास्त्री यांनी म्हटले आहे की, हा विजय म्हणजे केवळ धावांचा विषय नाही. मैदानावर आपण ज्या पद्धतीने धावा जमवता त्याच्या संघावर प्रचंड प्रभाव पडतो. विराटची कामगिरी पाहून मी असे म्हणतो की, विराट हा जगातील एक उत्कृष्ट खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेतील विजयाबाबत प्रतिक्रिया देताना, आपला उत्साह कायम ठेवत सदैव सदिच्छा देणार्‍या सर्वांचे आभार मानत विराट म्हणाला की, माझ्या क्रिकेट करिअरमधली अवघी आठ ते नऊ वर्षे राहिली आहेत. त्यामुळे या संधीचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याचा माझा विचार आहे. ही खूपच आनंदाची बाब आहे की मी तंदुरुस्त आहे आणि मला नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे.

9 हजार 500 धावा पूर्ण
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सहाव्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने एका
नवा विक्रम केला आहे. आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहलीने सातत्याने चागंला खेळ केला. सहाव्या सामन्यात विराटने शतक करुन 9 हजार 500 धावा पूर्ण केल्या आहेत, अशी कामगिरी करणारा कोहली पाचवा भारतीय खेळाडू आहे. सर्वात जास्त धावा करण्याच्या यादीत कोहलीच्या पुढे एकूण 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18,426 धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला, तर सौरव गांगुली (11,221) दुसरा, राहुल द्रविड (10,768) तिसरा आणि महेंद्रसिंह धोनी (9,780) चौथ्या स्थानावर आहेत.