जळगाव । तबला वादन,गायन आणि त्याची साथसंगत, बासरीच्या जुगलबंदीच्या मधुर वाणीने सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित भारतरत्न भीमसेन जोशी शास्रीय संगीत महोत्सव 2017 चा समारोप बालगंधर्व खुले नाट्यगृहात पार पाडण्यात आला. महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याचे नागरिकांची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. तबलावादक उन्मेशा आठवले यांच्या तबला वादनाने संपूर्ण नाट्यगृह वाद्याच्या नादात तालबध्य झाले होते. कलाकारांनी सादर केलेली केलेला प्रेषका.नी टाळ्याचा प्रचंड प्रतिसाद दिला. यामुळे कलेचे सादरीकरण करीत असलेल्या कलाकारांचा कलात्मक उत्साह शिगेला पोहचला होता. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचलनालय आयोजित चांदोरकर प्रतिष्ठान नियोजित भारतरत्न भीमसेन जोशी शास्रीय संगीत महोत्सवाचे प्रथमच आयोजन जळगाव शहरात करण्यात आले होते. सूत्रसंचलन धनंजय धनगर तसेच अपूर्वा कुळकर्णी यांनी केले.
जिल्ह्यातील एकमेव कलाकाराचा सहभाग
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील बासरी वादक विवेक सोनार हे एकमेव खानदेशातील एकमेव कलाकाराचा आयोजित संगीत महोत्सवा मध्ये सहभाग होता. त्यांच्या बासरी वादनाच्या शेवटी कार्यक्रमाने भारतरत्न भीमसेन जोशी शास्रीय संगीत महोत्सवाचा समारोप करण्यात आला. जळगाव जिल्ह्याचा कलावंत असल्याचे त्याचे कार्यक्रमा प्रसंगी विशेष कौतुक करण्यात आले. बालगंधर्व सभागृहात सुरू असलेल्या या तीन दिवसीय संगीत महोत्सवात आज रुचिरा पांडा कलकत्ता, उन्मेशा आठवले, विवेक सोनार यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी बालगंधर्व खुले नाट्यगृह रसिकांनी भरगच्च भरले होते.
तबल्यावर त्रीतालाचा चक्रधार
तबला वादक उन्मेशा आठवले यांच्या तबला वादन सादरीकरणाने बालगंधर्व नाट्यगृहात उपस्थित संगीत प्रेक्षकांनी दाद दिली. त्यांनी त्रिताला मध्ये कायदे व तिहाई वादन त्यांनी यावेळी केले. तबला वादनामध्ये एक अंगुली चा कायदा आपल्या वादनात आठवले यांनी सादर केला.त्यांना हार्मोनियमवर सातसंगथ प्रियंका भिसे यांनी केले. तबल्यावरील वादन केलेले तालाचे महत्व संगीत क्षेत्रात कसे आहे याबाबत त्यांनी माहिती दिली. जळगावकर संगीत प्रेमी आहेत. त्यांनी या बाबत उपस्थित प्रेक्षकाचे आभार मानले.
बासरी वादनाने समारोप
भारतरत्न भीमसेन जोशी संगीत महोत्सवा मध्ये समारोपा प्रसंगी शास्रीय गायनाची मेजवानी देण्यात आली होती. कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असताना प्रेक्षकाचा हिरमोड नको म्हणून रुचिरा पांडा (कलकत्ता) यांचे शास्रीय गायनाने उपस्थिताचे मन जिंकले टाळ्याच्या प्रतिसाद देताना आपली कला सादर करणार्या कलावंताचे हृद्य देखील या वेळी भरून आलेली दिसलेत. शास्रीय गायन करणार्या रुचिरा पांडा यांना तबल्यावर साथसंगथ प्रशांत डे यांनी केली तर हार्मोनियम वादन अनिरबद चक्रवती यांनी केले. या वेळी आयोजकाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला होता.