शहादा-शहरातील गरीब नवाज कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर ३ तरुणांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या तीन नराधमांनी केलेल्या कृत्याचा निषेध केला जात आहे. एका १६ वर्षाच्या मतीमंद मुलीचा गैरफायदा घेत ३ तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस ठाण्याजवळील भेंडवा नाला भागात ही घटना घडली आहे. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तरुणांना पकडले. ती मतिमंद मुलगी बुधवार रात्री पासून गायब होती. गुरुवारी पहाटे ती आढळून आली आहे.