शाहरुख खानही ‘कसौटी जिंदगी की’ मध्ये

0

मुंबई: ‘कसौटी जिंदगी की’ छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आता दुसरा भाग घेऊन येत आहे. या मालिकेचे चाहते दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्माती एकता कपूरदेखील या मालिकेत कोणतीही कमी पडून देणार नाही हे दिसून येत आहे. या मालिकेत आता बॉलिवूडचा किंग खान शाहरूखची एन्ट्री होणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

शाहरूख खान ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेत नरेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या तीन भागांसाठी शाहरूख खान नरेटर असणार आहे.’कसौटी जिंदगी की’ या मालिकेमध्ये एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर पार्थ समाथान हा अनुरागची भूमिका करणार आहे. या नव्या पात्रांची ओळख करुन देण्याची जबाबदारी शाहरुखने उचललेली असून तो या पात्रांची ओळख करुन देणार आहे. कोमिलाकाच्या भूमिकेत ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ची अशक्षरा हिना खान आता खलनायीकांच्या भूमिकेत दिसणार आहे.