मुंबई। भारतीय संघातील माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांचा मंगळवारी साखरपुडा अगदी थाटात पार पडला. यानिमित्ताने मुंबईमध्ये शानदार पार्टीचे आयोजन करण्यात आले. एका महिन्याआधीच झहीरने साखरपुड्याची घोषणा केली होती.
लवकरच या दोघांच्या लग्नाची तारीख जाहीर केली जाणार आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमात विराट आणि अनुष्का पुन्हा एकत्र दिसले. विराट-अनुष्का एकत्र कार्यक्रमाला आल्याने दोघांबद्दलची चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. येत्या डिसेंबरदरम्यान विराट आणि अनुष्काही साखरपुडा करतील अशी शक्यता आहे. झहीरच्या कार्यक्रमात अगदी सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर खिळल्या होत्या. कार्यक्रमातील दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार या कार्यक्रमाला हजर होते. याशिवाय रोहित शर्मा, युवराज सिंग, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली, गौरव कपूर उपस्थित होते