पुर्व भारतातील तीन राज्यांमधील विधानसभांच्या निवडणूकींचे रणशिंग फुंकले गेले आहे. काँग्रेसने मेघालयमधून त्याची सुरुवात केली आहे. पण लोकसभेची मुदतपुर्व निवडणूक होण्याच्या शक्यतेवरुन काँग्रेसमधील वातावरण जरासे तापलेले आहे. लोकसभेची मुदतपूर्व निवडणूका होण्याची चर्चा नवीन नाही. भाजपने याआधीही निरनिराळ्या व्यासपिठांवरुन मुदतपूर्व निवडणूकीबाबत सुतोवाच केले आहे. पण संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर लोकसभेच्या मुदतपुर्व निवडणूकांची शक्यता गृहीत धरली जात आहे. लोकसभेच्या मुदतपुर्व निवडणूका घेण्याच्या केंद्र सरकाराच्या विचारांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर बळकटी मिळाली आहे. आपल्या अभिभाषणात अनावश्यक खर्च टाळण्यासाठी लोकसभा आणि विविध राज्यांमधील विधानसभेच्या निवडणूका एकत्रित घेण्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोमवारी लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यात आपला सूर मिसळवला. त्यामुळे मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगडमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणार्या विधानसभेच्या निवडणूकांसोबतच लोकसभेच्या निवडणूका होण्याची शक्यता राजकिय विश्लेषकांनी वर्तवली आहे. लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी भाजपने आधीपासूनच तयारी केली आहे. पण काँग्रेस यासाठी कितपत तयार आहे हे सांगणे कठिण आहे. केंद्रात सत्ता आल्यानंतर लगेचच भाजपने पुढील निवडणूंकामध्ये देशात सर्वत्र कमळ फुलवण्यासाठी मेहनत घ्यायला सुरुवात केली होती. काँग्रेसमात्र याबाबतीत खूप मागे पडली आहे. राजकिय विश्लेषकही ही गोष्ट मान्य करतात. फेब्रुवारी महिन्यात पुर्व भागातील नागालँड, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्रिपुरामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्शाची राजवट आहे. यावेळी भाजपने त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्रिपुरामधील एक तृतीयांश जनता गुरु गोरखनाथांना पुजते. यात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सांप्रदायाचे महंत आहेत. भाजपसाठी ही जमेची बाजू असल्यामुळे त्यांचे हायकमांड याठिकाणी मोठ्या विजयाची अपेक्शा बाळगून आहेत. पुर्व भारतातील यंदाच्या विधानसभेची निवडणूक मोठ्या गाजावाजाची ठरणार हे निश्चित.सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस भाजपच्या तुलनेत खूप मागे पडली असल्याचे राजकिय विश्लेषक मान्य करतात.
भाजपने बुथ पातळीवरुन आपल्या कामाची याआधीच सुरुवात केली आहे. तर कॉग्रेस येथेही अजून मागेच आहे. ज्यापद्धतीने भाजपने बुथ पातळीवरुन आपली बाजू भक्कम करण्यास सुरुवात केली आहे त्यातुलनेत काँग्रेसमध्ये अद्याप कसलीच हालचाल दिसत नाही आहे. ज्या ठिकाणी काँगेे्रस मजबुत होती तिकडेही आता ते बॅकफूटवर ढकलले गेले आहेत. मागील लोकसभेच्या निवडणूकीत काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने एकत्रित निवडणूक लढवूनही दोघांच्या हाती काहीच लागले नाही. पुढच्या काळात दक्शिणेत विधानसभांच्या निवडणूका होणार आहेत आणि काँग्रेस एकामागून एक अशा पद्धतीने विविद राज्यांमधील आपली सत्ता घालवून बसली आहे. त्यामुळे आपला राजकिय वारसा सांभळण्यासाठी काँग्रेसला अथक परिश्रम घ्यावे लागणार. मंगळवारी काँग्रेसचे नुतन अध्यक्श राहुल गांधी शिलाँगमधील एका संगीत कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्याआधी त्यांनी पक्शाच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यांनी जोवालचाही दौरा केला होता. दोन्ही ठिकाणी राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांसमवेत सेल्फी काढल्या, लोकांच्या भेटी घेतल्या. या दौर्याने मेघालयमधील निवडणूकांचा प्रचार सुरु केला असल्याचे ट्विट केले. या ट्विटमध्ये, मोठ्या संख्येने लोकांनी स्वागत केले. मी आणि माझे कुटुंबिय खूप आधीपासून पूर्व भारताशी जोेडलेलो आहोत. प्रत्येक दौर्यानंतर इथल्या जनतेशी असेलेले सबंध आणखी घट्ट होत गेले. मुदतपूर्व निवडणूकांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पार्टीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण व्हावा म्हणून लोकांशी थेट संपर्क साधण्यावर भर देण्याचा विचार काँग्रेसचे रणनितीकार करत आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा होताच फेब्रुवारीच्या शेवटी एक विशेष अधिवेशन बोलवण्याचा विचार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात आहे. या विशेष अधिवेशनात सहभागी होणार्या देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल अशी आशा आहे. भाजप सरकार आक्रमक प्रचार तंत्राचा वापर करत राजकिय आघाडी मिळवली असल्याचे दाखवत आहे. मात्र तशी स्थिती अजिबात नाही आहे. काँग्रेसच्या मते घसरलेला जिडीपी आणि आर्थिक शैथिल्याच्या जोडीने बेरोजगारी आणि वाढत्या महागाईमुळे जनता नाराज असल्याचा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत. त्यामुळे अगदी खालच्या पातळीपासून लढण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत करण्याची गरज असल्याचे हे नेते मान्य करतात. राहुल गांधी काँग्रेसचे नवे अध्यक्श झाल्यानंतर त्याच्यावर कार्यकर्ता पातळीवर शिक्कामोर्तब करण्यासाठीही अशा अधिवेशनाची गरज असल्याचे काँग्रेस नेत्यांचे मत आहे. काँग्रेसचे हे विशेष अधिवेशन दिल्ली किंवा पंजाबमध्ये होण्याची शक्यता आहे.
एकत्रित निवडणका घेण्याच्या महत्वाच्या मु्द्यावर देशव्यापी चर्चा होऊन त्यावर सहमती व्हायला पाहिजे असे मत कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. एकत्रित निवडणूकीला होकार देताना प्रसाद म्हणाले की, देशात वर्षभर कुठेतरी निवडणूका होतच असतात. नुकत्याच हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये निवडणूका झाल्या. दिड महिन्यानंतर त्रिपुरा आणि मणिपुरमध्ये निवडणूका आहेत. त्यानंतर कर्नाटक, छत्तिसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये निवडणूका आहेत. सततच्या निवडणूंकामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर खूप बोझा पडतो, सरकारी यत्रंणांनाही प्रत्येक निवडणूकीसाठी नव्याने तयारी करावी लागते. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका एकत्रित झाल्यास या सगळ्या समस्या सुटतील.
– विशाल मोरेकर
प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई
9869448117