शिंदखेडा पंचायत समितीतील लाचखोर कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

0

शिंदखेडा- शेतातील मंजूर झालेल्या सिंचन विहिरीला तांत्रिक मान्यता आदेश मिळवून देण्यासाठी एक हजारांची मागणी करणार्‍या पंचायत समितीमधील कनिष्ठ सहाय्यक कोमलसिंग देविसिंग राजपूत यांना मंगळवारी एक हजार रुपयांची लाच घेताना धुळे येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. तक्रारदाराची कलमाडी शिवारात तक्रारदाराची एक हेक्टर शेतजमीन असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर झाली आहे. याविषयी प्रशासकीय मान्यता आदेश 16 ऑक्टोबर रोजी काढण्यात आला असून तांत्रिक मान्यता आदेश मिळण्यासाठी तक्रारदाराकडे आरोपी पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक लिपीक कोमलसिंग गिरासे यांना एक हजाराची लाच मागितल्याने एसीबीने सापळा रचून आरोपीस अटक केली.