शिंदखेडा पं.स.कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा

0

शिंदखेडा -येथील पंचायत समिती कार्यालयावर तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनिस यांचा विविध मागण्यासाठी थाळीनाद मोर्चा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना कार्यध्यक्ष युवराज बैसाणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.हयाप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी सुरेश शिवदे यांना देण्यात आले.

निवेदनात या केल्या मागण्या
शिंदखेडा येथील चिमठाणे सभेत विमलताई पाटील यांना प्रकल्प अधिकारी बी.व्ही.बिरारी यांनी अपमानास्पद वागणूक दिली त्या खुप रडल्या.बीपी वाढल्याने दवाखान्यात दाखल केले.अशा अधिकारी यांची हाकलपट्टी करावी.तसेच विखरण येथील सभा संध्याकाळी ७ वा.सोडली बाहेर गावाहून आलेल्या कर्मचारी यांचे घरी पोहचण्यास विलंब झाला.हयापुढील सभा चार वाजेपर्यंत सोडण्यात यावी.म्हळसर येथील मदतनीस निर्मला पाटील व चिमठाणे येथील सेविका मंगला निंबा यांना दहा महिन्यांपासून मानधन दिले गेले नाही त्यांना ते त्वरीत मिळावे.बाल विकास प्रकल्पअधिकारी यांच्या कडुन सभेत वेळोवेळी कर्मचारी यांना सेवेतून काढून टाकण्याची धमकी देणे.दोन वर्षांपासून प्रवास भत्ता दिला नाही तो त्वरीत मिळावा.अंगणवाणी केंदाच्या प्रशासकीय खर्च म्हणुन अंगणवाडी केंदाच्या दोन हजार देण्यात यावे.अंगणवाडी केंद्रातील नादुरुस्त झालेले वजन काटे त्वरीत पुरविण्यात यावे.पर्यवेक्षिका आव्हाड यांच्या मार्फत बचत गटातुन सर्व कर्मचारी यांचे हप्ते गोळा करून आणुन द्या हे बंद व्हावे.बेटावद येथील सेविका रेखा कोळी व प्रमिला सोनगडकर अक्षरे दिलेला असतांनाच तिनं दिवसाचे मानधन कपात केले ते त्यांना परत मिळावे.दप्पर वेळेवर मिळावे.यासह विविध मागण्या चे लेखी निवेदन देण्यात आले.

विविध समस्या निवारणचे दिले अस्वासन
पंचायत समिती कार्यालय समोर दुपारी तीन वाजेपर्यंत धरणे आंदोलन सुरू असताना अंगणवाडी सेविका यांचे शिष्टमंडळाशी गटविकास अधिकारी यांनी सर्व मागण्या वर चर्चा केली व संबधित प्रकल्प अधिकारी बीरारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दुरध्वनी वरुन दोन दिवसांत कार्यमुक्त करतो व विविध विषयांचे निरसन केले जाईल असे लेखी आश्वासन दिले तर यावर अंगणवाडी सेविका नी आंदोलन मागे घेतले.

मोर्चात यांनी घेतला सहभाग
हयाप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्यामकांत सनेर , नगरसेवक सुनील चौधरी, पंकज सोनवणे, माजी सभापती शामकांत पाटील व तनिष्का महिला अध्यक्षा छाया पवार, प्रतिती शाह, अंजली पवार यांनी भेट दिली. व महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात तुमच्या पाठीशी आहोत असे सांगितले. मोर्चा यशस्वी ते साठी अध्यक्ष माया परमेश्वर कार्याध्यक्ष युवराज बैसाणे ,अमोल बैसाणे, यंत्रांना पाटील, आशा पाटील, रंजना सोनवणे, मालती पाटील, निर्मला बैसाणे, अनिता गिरासे,जन्याबाई पाटील, मिना जैन,अलका ठाकुर, विमल पाटील, यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.