शिंदखेडा । महावीर जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे रविवार 9 रोजी भगवान महावीर जयंती निमित्त येथील जैन स्थानकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संघ च्या वतीने सकाळी साड़े आठ ते साड़े नउच्या दरम्यान स्वाधायी प्रवीण पारख, प्रा.सी. डी. डागा, डॉ. सुरेश टाटिया यांचे भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित प्रबोधन होईल.10वाजता जैन कॉन्फ्रेंस तर्फे ग्रामीण रूग्णालयात फळ वाटप. भारतीय जैन संघटनेच्या वतीने दुपारी 2 ते 3 स्तवन स्पर्धा, तीन ते 4 च्या दरम्यान प्रश्न मंच होईल.दोन्ही स्पर्धामध्ये प्रथम तीन येणार्या विजेताना रुपये तिनशे, दोनेशे व शंभर चे रोख पारितोषिक देण्यात येईल.संघटनेचे शहर अध्यक्षू निखिल रुणवाल, साचिव सचिन गुजराथी यांच्याकडे पांच तारीखे पर्यंत द्यावी. जैन अलर्ट ग्रुप ऑफ शिंदखेड़ा च्यावतीने रात्री 8 वा. जैन स्थानकात ’आजच्या परिस्थितीत जैन सिद्धान्ताचे महत्व ’ या विषयावर वकृत्व स्पर्धे घेण्यात येईल. या स्पर्धेत समाजातील सर्व वयोगटातील महिला व पुरुष यांना सहभाग घेता येईल. स्पर्धेमध्ये मोठ्या संखेने भाग घेण्याचे आवाहन श्री संघ चे संघपती खुशालचन्द ओस्तवाल, साचिव प्रा. डागा यांनी केले.